धाबा ते लोहगड रस्त्याचे थांबलेले काम त्वरित सुरु करा -समनक जनता पार्टी

धाबा ते लोहगड रस्त्याचे थांबलेले काम त्वरित सुरु करा -समनक जनता पार्टी

शाळकरी विद्यार्थी त्रस्त प्रशासन मस्त

बार्शिटाकळी :- प्रतिनिधी

बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा ते लोहगड रोड मधील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रवास

अक्षरशः जीवघेणा झाला आहे, रगडलेला काम सात दिवसाच्या आत न केल्यास समनक जनता पार्टी बार्शिटाकळीचे

तालुका अध्यक्ष अतिश राठोड यांनी आज बार्शीटाकळी तहसील कार्यालय येथे निवेदन देतांना आव्हान केले.

धाबा या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दवाखान्यात जाण्यासाठी गरोदर महीला असो,

शाळकरी विद्यार्थी यांना येण्यासाठी कष्ट भोगावे लागतात आहे,रोड आहे की गड्डे आहे ते राहलेच नाही करीता प्रति लिपी जिल्हाधिकारी अकोला,

कार्यकारी अभियंता अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना निवेदन व्दारे कळवीण्यात येत की येत्या सात दिवसा

धाबा महान रोडचे काम न झाल्यास प्रा संदेश भाऊ चव्हाण समनक जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, प्रा डॉ अनिल भाऊ राठोड समनक जनता पार्टी महासचिव,

प्रदेश अध्यक्ष कालपाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात

येईल बार्शिटाकळी समनक जनता अध्यक्ष अतिश राठोड, कुलदीप चव्हाण, शिवराज जाधव, दिनेश सोळंके,

भुषण राठोड, गिरधर राठोड, गणेश खराटे, सुनिल जाधव, प्रविण राठोड, जिवन जाधव, अजय राठोड, निलरत्न सरकटे,

निलेश चव्हाण, रोहीत चव्हाण, विक्रम जाधव, विशाल चव्हाण, अभय सरकटे यांनी निवेदन व्दारे आव्हान करण्यात आले.

Read Also : https://ajinkyabharat.com/vidarbha-pune-kolhapurah-rajyaat-musadhar-pavasacha-gesture-yellow-alert-issued/