उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने ५५ लाखांची फसवणूक; पाचोरा दाम्पत्याचा कारनामा

बनावट ओळखपत्र, लेटर पॅड वापरून १८ ते २० जणांना गंडा; रेल्वे नोकरी, म्हाडा फ्लॅटचे आमिष

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक

झाल्याचा प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. पाचोरा येथील हितेश रमेश संघवी आणि त्यांची पत्नी अर्पिता संघवी

या दाम्पत्याने ही फसवणूक केली असून, शहरात खळबळ उडाली आहे.स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून फसवणूक
हितेश संघवीने स्वतःला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून बनावट ओळखपत्र, लेटर पॅड

आणि अपॉइंटमेंट लेटर तयार केले. नोव्हेंबर २०२४ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत त्याने १८ ते २० जणांना विविध आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला.

रेल्वे नोकरी व म्हाडा फ्लॅटचे आमिष“रेल्वेमध्ये नोकरी लावतो”, “म्हाडामध्ये स्वस्तात फ्लॅट मिळवून देतो” तसेच

“शासकीय कामं करून देतो” अशा आश्वासनांनी आरोपी दाम्पत्याने पीडितांकडून मोठी रक्कम उकळली.

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडेया प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची जबाबदारी

आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. पोलिस आरोपींच्या मालमत्ता, बँक व्यवहार आणि इतर व्यवहारांची तपासणी करत आहेत.

आणखी कोणी या फसवणूक रॅकेटमध्ये अडकले आहे का याचा शोध सुरू आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/yash-dayalvar-upcai-bandi-upct-20-leamdhun-baher/