पंधरा दिवसातली दुसरी भेट, राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची संघाशी खलबतं
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील
संघ कार्यालयाला आज भेट दिली आहे. संघ कार्यालयातील
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष बाब म्हणजे संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गेल्या पंधरा दिवसातली
ही सलग दुसरी फडणवीसांची भेट आहे. राष्ट्रीय पदासाठी देवेंद्र फडणवीस
यांच्या नावाची चर्चा असताना या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.
साधारण अर्धा तास या बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे.
त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या
नागपूर येथील संघ कार्यालयात नसल्याची ही माहिती पुढे आली आहे.
मात्र, त्यांच्या अनुपस्थित देवेंद्र फडणवीस हे संघातील वरिष्ठ नेत्यांची
भेट घेऊन त्यांनी चर्चा केली आहे. साधारणतः अर्धा तासाच्या या भेटीमध्ये
अनेक विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर
राष्ट्रीय राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे चांगलेच सक्रिय झाले असून
सध्या घडीला त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे.
त्याच अनुषंगाने गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी भेट असल्याचे
देखील बोलले जात आहे. या एकंदरीत भेटी संदर्भात देवेंद्र फडणवीस हे
नेमकी काय भूमिका मांडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र आगामी निवडणूक आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावासंदर्भात
या भेटीला फार महत्त्व प्राप्त झाल्याचे देखील बोलले जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakarne-suvarnapadakachaya-asha-unchavalya/