जि प बांधकाम उपविभाग आकोट यांच्या कामचुकारपणामुळे देवरी गावांमधुन जाणारा पिंपरी आलेगाव वनी तेल्हारा रोडला जोडणारा रस्ता हा कित्येक वर्षापासून बांधकाम झाल्यानंतर त्याची साधी रिपेरिंग सुद्धा करण्यात आली नाही त्यामुळे रस्त्याने चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे.
पिंपरी डिक्कर गावातील नागरिक हे अकोटला जातानी वनी वारूळा मार्गे जातात देवरी ते आलेगाव हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये तरी रस्ता होईल परंतु जि प बांधकाम विभाग अकोला यांनी रस्त्यावरील साधे वाढलेले बंगाली बाभळीचे बन सुद्धा तोडण्यात आले नाही शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील साफसफाई करून त्यांच्या शेताला गराडा घातला व वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला.
देवरी गावकऱ्यांचे पंचमुखी महादेव हे आराध्य दैवत आहे श्रावण महिना असल्यामुळे देवरी गावच्या पंचक्रोशी मधील महादेवाचे भक्तगण कावळ घेऊन मंदिरावर येतात गावातीलच शेकडो भाविक भक्त दररोज मंदिरात जातात परंतु प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या जवळून तर देवरीच्या स्टॅन्ड पर्यंत रस्त्याने चालता येत नव्हते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कोणतेही पेशंट जात नव्हते.. एकाच साईटने ग्रामपंचायत यांनी नाली बांधकाम करण्याकरता नाली खोदून ठेवली आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप भयानक अवस्था झाली होती परंतु आमचे प्रतिनिधी यांनी वारंवार जि प बांधकाम उपविभाग मा. इंगळे साहेब शाखा अभियंता वैभव सोनवणे यांना पाठपुरावा करून तात्काळ अतिवृष्टी मधून निधी प्राप्त करून घ्यावा व रस्ता हा व्यवस्थित करावा अशी मागणी घालतात त्यांनी तात्काळ रस्त्यावर मुरूम टाकून दिला व मिलिंद पाटील गायकवाड यांनी स्वतःच्या जेसीपी ने मुरूम फैलवूनभाविक भक्तांकरिता रस्ता व्यवस्थित करून दिला त्यामुळे गावकऱ्यांनी दै.अजिंक्य भारत न्युज पेपर चे आभार व्यक्त केले.
गावात नाली बांधकाम चालू असल्यामुळे गावकऱ्यांनी …माझं घर .माझ्या घरापुढे ओठा.. ओठ्यापुढे माझा गोटा… गोट्यापुढे ग्रामपंचायत ची नाली अशा प्रकारचे अतिक्रमण केले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ रस्ते मोकळे करावे व सांडपाण्याचा विल्हेवाट लावण्याकरता आम्ही स्वतः ग्रामपंचायत जबाबदार आहे.मुरूम टाकण्याबाबत वारंवार अधिकाऱ्यांना सांगून मुरूम टाकून घेतला..
डॉ. योगेश गायकवाड
माजी उपसरपंच
मी वारंवार माझ्या सर्कलचे जि प माजी सदस्य यांना वेळोवेळी महादेव मंदिरा च्या रस्त्याबाबत अनेक वेळा कल्पना दिली परंतु त्यांना कुठे काय कसे याचा थांग पत्ता नाही पाच वर्षे त्यांनी कोणत्याही प्रकारचे देवरी गावाचे विकास कामे झाले नाहीत त्यामुळे त्यांना देवरी गावाचे काहीच माहित नाही.
मिलिंद पाटील गायकवाड
तंटामुक्ती अध्यक्ष
गावामध्ये प्रशस्त असे महादेव मंदिर आहे या मंदिरावर जाता येत नाही एक साईट नालीचे पाणी आहे आणि त्या नालीच्या पाण्यामधूनच महादेवाच्या भक्तगणांना महादेवाच्या मंदिरामध्ये जावे लागते
त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी व अजिंक्य भारत वृत्तपत्राचे वार्ताहर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून
… रस्त्यावर मुरूम टाकुन घेतला..
गजानन भगवंतराव फोकमारे
देवरी फाटा तेआलेगाव गाव जोडनी रस्ता हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. आज पावसाळी परिस्थिती असल्यामुळे जि प बांधकाम विभाग आकोट च्या माध्यमातून मुरूम टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
इंगळे साहेब
जि प उप बांधकाम अकोट