संत गजानन महाराजांच्या पालखीचे भव्य आगमन – खामगाव ते पायी वारीत लाखो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

संत गजानन महाराजांच्या पालखीचे भव्य आगमन – खामगाव ते पायी वारीत लाखो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

खामगाव ते शेगाव रस्ता भक्तांनी फुलला

खामगाव (पंकज ताठे) |

संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने खामगाव ते शेगाव दरम्यान पायी वारीत लाखो भाविकांनी सहभाग घेतल्याने

संपूर्ण मार्ग भक्तिमय आणि पवित्र वातावरणाने भरून गेला होता. खामगाव शहरातून निघालेली

पालखी आज सकाळी संत नगरी शेगावात अत्यंत मंगल वातावरणात पोहोचली.

गजरात “गण गण गणात बोते” आणि “संत गजानन महाराज की जय”च्या घोषणा निनादत होत्या.

भगवे झेंडे, टाळ मृदुंगाचा गजर, भक्तांच्या अभंग गायनाने रस्ता भक्तिमय झाला होता.

महिलांचे ढोलपथक, लहानग्यांचे वेशभूषा फेरी, युवकांचे सेवाकार्य, आणि अनेक वारकरी दिंड्यांनी या वारीचे स्वागत अधिकच लोभसवाणे केले.

वारीमध्ये खामगाव, मलकापूर, बुलडाणा, चिखली, मलकापूर, जलगाव जामोद, वाशिम, अकोला,

तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या भक्तांचा उत्साह लक्षणीय होता. अनेकांनी पायी चालत,

तर काहींनी पालखीच्या मागोमाग सेवा देत ही वारी पूर्ण केली. वाटेत अनेक ठिकाणी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.

शेगावमध्ये पोहोचताच गजानन महाराजांच्या समाधीस्थळी पालखीने दर्शन घेतले आणि पालखी

आगमनाचा जल्लोष भक्तांनी जलक्रीडा, फुलांचा वर्षाव, अभंग म्हणत उत्साहात साजरा केला.

पोलीस प्रशासन, पालखी सोहळा समिती आणि सेवाभावी संस्था यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे संपूर्ण वारी निर्विघ्न पार पडली.

या पायी वारीमुळे श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्तम दर्शन घडले.

ही वारी केवळ एक धार्मिक परंपरा नसून लोकांच्या मनामनात श्रद्धा आणि अध्यात्मिक उर्जेचा अनुभव देणारी एक महान यात्रा ठरली.

पालखी जात जात असताना भक्तांकडून जो कचरा होतो तो गोळा करून रस्ता स्वच्छ करण्याचे काम

गो.से.महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून कचरा गोळा केला.

Read Also :