दिल्लीवरून थेट खासदार आमदारांसह प्रयागराजमध्ये एकनाथ शिंदे, कुंभमेळ्यात करणार पवित्रस्नान

दिल्लीवरून थेट खासदार आमदारांसह प्रयागराजमध्ये एकनाथ शिंदे, कुंभमेळ्या

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत

अमित शहा यांची भेट घेतली. खासदार आणि

आमदार यांच्यासह शिंदे हे प्रयागराजला पोहोचणार आहेत.

एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून

जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय.

मात्र, मी नाराज असल्याचे अगोदरच शिंदेंनी स्पष्ट केले.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिल्ली दाैऱ्यावर होते.

एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. अमित शहा यांची भेट शिंदेंनी घेतलीये.

आता दिल्लीवरून थेट प्रयागराजला शिंदे हे जाणार आहेत.

Related News

विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत खासदार आणि आमदार देखील असणार आहेत.

यावेळी शिंदे हे महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच

कुंभमेळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचले होते. यावेळी त्यांनी तिथे पूजा करत पवित्र्य स्नान केले.

कुंभमेळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक राजकिय लोकांनी पवित्र स्नान केले.

भाविकांनी मोठी गर्दी सध्या कुंभमेळ्यात बघायला मिळतंय.

देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते कुंभमेळ्यात पोहोचले. आता शिंदे हे देखील प्रयागराजला पोहोचणार आहे.

देवेंद्र फडणवीस हे पत्नी आणि मुलीसोबत कुंभमेळ्यात पोहोचले होते.

अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट

कुंभमेळ्यातील काही खास फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

एकनाथ शिंदे नाराज असल्याने दिल्ली दाैऱ्यावर गेल्याचे सांगितले जात होते.

अमित शहा यांनी त्यांची समजूत काढल्याचे देखील सांगितले जाते.

या भेटीबद्दल बोलताना उदय सामंत यांनी म्हटले होते की,

एकनाथ शिंदे साहेबांची अमित शाह यांच्यासोबत बैठक राज्यातील विकासकामांबद्दल होती. केंद्रातून राज्यात निधी कसा जास्तीत जास्त आणायचा यासाठी ती बैठक होती.

खासदार आमदारही शिंदेंसोबत प्रयागराजमध्ये

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच ही बघायला मिळाली.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री.

तेव्हापासूनच सातत्याने सांगितले जाते की, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत.

त्यामध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा हा देखील अजून सुटलेला नाहीये.

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिंदे आग्रही आहेत.

More news here

https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murder-murder-case-chandrashekhar-bawankue-yancha-mothe-vidhan-mhanale-aamchaya-sarkar/

Related News