दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची महत्त्वाची बैठक; सर्व राज्यांना अलर्ट

दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची महत्त्वाची बैठक; सर्व राज्यांना अलर्ट

नवी दिल्ली / नाशिक (दि. ६ मे):

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने

देशभरात ७ मे रोजी युद्धसदृश मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related News

ही मॉक ड्रिल एकाच वेळी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांचे मुख्य सचिव,

नागरी संरक्षण सचिव, एनडीआरएफ व एसडीआरएफ अधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

या बैठकीत प्रत्येक राज्याला मॉक ड्रिलबाबत सविस्तर सूचना दिल्या जात आहेत.

यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील बैठकीचे ब्रिफिंग देण्यात येणार आहे. यामध्ये हवाई हल्ला,

ब्लॅकआऊट, सुरक्षित स्थलांतर आणि आपत्कालीन प्रतिसाद यासारख्या घटकांचा समावेश असणार आहे.

नाशिकसह राज्यभर तयारी पूर्णत्वाकडे

नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक पार पडली असून पोलीस, अग्निशमन,

आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यक साहित्य, रुग्णवाहिका,

वायरलेस सिस्टम आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकार हायअलर्टवर

राज्य सरकारकडून अंतर्गत हालचालींना वेग देण्यात आला असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना जिल्हास्तरावर संपर्कात राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मॉक ड्रिलमागील हेतू काय?

सध्या भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव असून युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांनी आपत्कालीन स्थितीत स्वतःची सुरक्षा कशी करावी, यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात येत आहे.

नागरिकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bharat-udya-vajnar-western-siren/

Related News