Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे.
दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) सध्या ट्रेंडनुसार मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या भाजप 43, आप (AAP) 27 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस (Congress) एकाही जागेवर आघाडीवर नाही.
Related News
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि ...
Continue reading
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
IPL 2025 मध्ये आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले. काही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले,
तर आता उरलेल्या एक जागेसाठी लढत ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाबाहेर प्रवास करताना लागणारा पासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
भारतात 'पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0' अंतर्गत ई-पासपोर्ट (Electro...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ही आग अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील स्वागत कक्ष परिसरात ल...
Continue reading
प्रयागराज | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सिव्हिल रिव्हिजन (पुनर्वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतामध्ये पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवणाऱ्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ पाकि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या
युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर ये...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
'ऑपरेशन सिंदूर'नंतर तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय परदेश दौऱ्याच्या प्रतिनिधिमंडळात तृणमूल काँग्रेसने
(TMC) सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. TMC ने स...
Continue reading
शोपियां | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षाबळांना मोठं यश मिळालं आहे.
दहशतवाद्यांना साथ देणारे दोन सहयोगी पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून
शस्त्रास्त्रे...
Continue reading
उत्तर प्रदेश | प्रतिनिधी
उत्तर भारतात प्रचंड उष्म्याची लाट सुरू असताना, उत्तर प्रदेशातील सर्व परिषदीय व मान्यता
प्राप्त शाळांमध्ये २० मे २०२५ पासून उन्हाळी सुट...
Continue reading
तर दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका दिसून येत आहे.
दिल्लीत 13 टक्के मुस्लीम मतदार असून पाच जागांवर याआधी मुस्लीम आमदार निवडून आले आहेत.
यंदा दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले आहे. मुस्तफाबाद, बल्लीमारन, सीलमपूर, मतिया महल, चांदणी चौक आणि
ओखला या मुस्लीम बहुल जागांवर काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
मुस्लीम बहुल मतदारसंघात भाजपचाच बोलबाला
दिल्लीतील सीलमपूर, मुस्तफाबाद, मटिया महल, बल्लीमारन आणि ओखला या जागांवर भाजप वगळता सर्व पक्षांचे मुस्लीम उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
मुस्तफाबाद मतदारसंघातून भाजपचे मोहन सिंग बिष्ट, आम आदमी पक्षाचे आदिल खान, काँग्रेसचे अली मेहंदी, एआयएमआयएमचे ताहिर हुसेन यांच्यात लढत होत आहे.
या मतदारसंघातून भाजपचे मोहन सिंग बिष्ट आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
तर बल्लीमारन विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून कमल बंगाडी, काँग्रेसकडून हारून युसूफ,
आम आदमी पक्षाकडून इम्रान हुसेन यांच्यात सामना रंगला असून येथेही भाजप उमेदवार आघाडीवर आहे.
तसेच ओखला विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अरिबा खान, भाजपकडून मनीष चौधरी,
आम आदमी पक्षाकडून अमानतुल्ला खान, एआयएमआयएमकडून शिफा उर रहमान यांच्यात लढत होत असून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत.
सीलमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अनिल गौर, काँग्रेसकडून अब्दुल रहमान आणि आम आदमी पक्षाकडून झुबेर
अहमद यांच्यात लढत होत असून भाजपचे अनिल शर्मा सीलमपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. मतिया महल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून दीप्ती इंदोरा,
आपकडून आले मोहम्मद इक्बाल, काँग्रेसकडून असीम मोहम्मद खान रिंगणात असून भाजपच्या उमेदवार आघाडीवर आहेत. आता या मुस्लीम बहुल विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या : https://ajinkyabharat.com/akhher-apush-tananyasathi-akola-naka-railway-pulawar-laganar-pathdive/