दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,

दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,

दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल-2 (T2)

सोमवारपासून तात्पुरत्या स्वरूपात देखभाल व सुधारणा कामांमुळे बंद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे इंडिगो आणि अकासा एअरने आपल्या सर्व उड्डाणांचे संचालन टर्मिनल-1 वर हलवले आहे.

Related News

टर्मिनल-1 आणि टर्मिनल-3 पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील.

विमानतळ प्रशासनाने सांगितले की, उड्डाणांचे वेळापत्रक सामान्य

असून प्रवाशांसाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

या निर्णयामुळे एक रनवे देखील देखभालीसाठी बंद करण्यात आला आहे.

T2 बंद, इंडिगो-अकासा T1 वर; प्रवाशांना सूचित करण्याचे प्रयत्न

T2 टर्मिनल सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते आणि सध्या त्यातून

फक्त इंडिगो व अकासा एअरच्या फ्लाइट्स सुरू होत्या.

हे टर्मिनल बंद केल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी प्रवाशांना वेळेत माहिती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

अकासा एअरने देखील आपला ऑपरेशनल ट्रान्सफर सुरळीत करण्यासाठी तयारी केली आहे, असे स्पष्ट केले आहे.

T1 आणि T3 टर्मिनल्सचा मोठा भार; पण तयारी पूर्ण

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) च्या माहितीनुसार, विस्तारित टर्मिनल-1 सध्या दरवर्षी ४

कोटी प्रवाशांना हाताळू शकतो, तर टर्मिनल-3 ची क्षमता ४.५ कोटी आहे.

याउलट बंद करण्यात आलेल्या T2 ची क्षमता १.५ कोटी प्रवाशांची होती.

नागरिक उड्डाण विभागाचे सचिव वुमलुनमंग वुअलनाम यांनी सांगितले की,

T1 आणि T3 मिळून प्रवासी संख्या सहज हाताळू शकतील आणि T2 बंद झाल्यामुळे फारशी अडचण उद्भवणार नाही.

महत्त्वाची माहिती प्रवाशांसाठी:

  • टर्मिनल-2 बंद: एप्रिलपासून पुढील ४-५ महिन्यांसाठी.

  • इंडिगो आणि अकासा एअर: T1 वरून उड्डाणे सुरू.

  • प्रत्येक दिवशी अंदाजे 1300 उड्डाणे IGI वरून होतात.

  • टर्मिनल परिवर्तनाबाबत प्रवाशांनी वेळेवर माहिती तपासावी.

Related News