मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाचा विशेष शो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मनमोकळी प्रतिक्रिया देत चित्रपटाचं कौतुक केलं.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे म्हणाले
“दशावतारची कथा जरी कोकणातील असली, तरी त्यातील व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे.”
“आज आपण कुठे आहोत आणि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळेत ओळखलं नाही तर आपण कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवणारा हा चित्रपट आहे.”
“चित्रपटातील सर्वांचीच कामं उत्कृष्ट आहेत, पण दिलीप प्रभावळकर यांनी जे केलंय ते खरंच अद्भुत आहे.”
“सुबोध खानोलकर या तरुण दिग्दर्शकाने मराठीला एक परिपूर्ण चित्रपट दिला आहे.”
विशेष शोला मान्यवरांची उपस्थिती
या विशेष शोला उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, गायक अजय गोगावले, अभिनेते मिलिंद गुणाजी-राणी गुणाजी, अभिनेत्री छाया कदम यांची उपस्थिती होती.
कलाकार आणि निर्मात्यांचं कौतुक
उद्धव ठाकरेंनी दिग्दर्शक सुबोध खानोलकर, अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचं कौतुक केलं. तसंच झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, ओंकार काटे यांचं विशेष अभिनंदनही केलं.
प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
‘दशावतार’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, सहा दिवसांत तब्बल 9.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. केवळ मराठी नव्हे तर अमराठी प्रेक्षकही या सिनेमाकडे आकर्षित होत आहेत. माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपट सर्वत्र हाऊसफुल्ल चालत असून, प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/bhartaasathi-fakt-10-march-khela/