दापुरा येथे दुर्दैवी घटना: दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

दापुरा येथे दुर्दैवी घटना: दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दापुरा गावात 7 मार्च रोजी दुपारच्या सुमारास कोला

नाल्यात पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समर योगेश इंगळे (वय 12) आणि दिव्याशु राहुल डोंगरे (वय 14) अशी मृत मुलांची नावे आहेत.

Related News

प्राप्त माहितीनुसार, समर आणि दिव्याशु आपल्या दोन इतर मित्रांसोबत घराबाहेर गेले होते.

गावाशेजारील कोला नाल्याच्या पात्रात उतरताच समर आणि दिव्याशु पाण्यात बुडाले.

त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन मुलांनी गावात जाऊन घटना सांगितली.

नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली,

मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल गोपाळ,

पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे, सतिश सपकाळ, किशोर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read more news here : https://ajinkyabharat.com/amhala-ek-khoona-maa-kar-rohini-khadsenchn-theate-rashtrapatin-patra-neemkam-kay-mhatal/

Related News