दहिहांडाच्या कामावरून वाद, ५ लाखांची मागणी गोपाल दातकर अडचणीत

दहिहांडाच्या कामावरून वाद, ५ लाखांची मागणी गोपाल दातकर अडचणीत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अकोला जिल्ह्याचे अकोट येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे

यांनी शिवसेना ऊबाठाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा

आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती..या गोपाल दातकर यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यासह

Related News

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेय..मात्र गोपाल दातकर यांच्या विरोधात दाखल केलेली

तक्रार हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना ऊबाठाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहेय..

बात कर यांनी कोणतीही जातीवाचक शिवीगाळ केली नसून जनतेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्याला बोलले

असल्याचं ते म्हणाले..तर अशाप्रकारे जिल्ह्यातील इतर पक्षांच नेतृत्व संपवण्याचा काम भाजप करीत

असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहेय.. तर तक्रारकरता अधिकाऱ्यावर दोन महिलांनी याआधी गंभीर स्वरूपाचे आरोप केले

असून अधिकाऱ्याला निलंबन करण्याची मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे

तर अधिकाऱ्यावर लवकर कारवाई न केल्यास शिवसेनेचे

आंदोलन करण्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला आहेय..

अकोट उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे हे आपल्या कार्यालयात दैनंदिन कामकाजात होते.

त्यावेळी दहिहांडा (ता. अकोट) येथील सरपंच संजय आठवले आपल्या गावातील कामासंदर्भात चर्चा

करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले. त्या वेळी कार्यालयात काही कर्मचारी व इतर नागरिकही उपस्थित होते.

चर्चेदरम्यान, संजय आठवले यांच्या मोबाइलवरून माजी जि. प. सदस्य गोपाल दातकर यांनी इंगळे यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी हिंगणीगाव येथील कामाच्या स्थितीबाबत विचारणा केली. त्यावर इंगळे यांनी सविस्तर माहिती दिली.

यानंतर गोपाल दातकर यांनी आपल्या सर्कलमधील अंदाजे ५० लाखांच्या कामांबाबत चौकशी केली

व ‘त्यातून ५ लाख देण्याची व्यवस्था करावी’, अशी मागणी केली. मात्र, इंगळे यांनी याला स्पष्ट नकार दिला.

नकार मिळताच, दातकर यांनी धमकी देत जातिवाचक शिवीगाळ केली व “तुमच्या सर्कलमध्ये पाणी मिळू नये”

असा मुद्दा उपस्थित केला. हा संवाद इंगळे यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये

अर्धवट स्वरूपात रेकॉर्ड केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

त्यांच्या निर्देशानुसार १ एप्रिल रोजी अकोट शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

त्यावरून गोपाल रामराव दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related News