दहीहंडा येथे शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग; दोन ते अडीच लाखांचे नुकसान

दहीहंडा येथे शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग; दोन ते अडीच लाखांचे नुकसान

दहीहंडा | प्रतिनिधी

दहीहंडा येथील शोएब किराणा स्टोअर या दुकानाला 10 एप्रिल रोजी सायंकाळच्या

सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Related News

हे दुकान नियमत उल्ला खान सन्नाउल्ला खान यांच्या मालकीचे असून, उर्दू जिल्हा परिषद

शाळेजवळ त्यांच्या घरालगत आहे. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग

लागली आणि संपूर्ण दुकान काही क्षणातच जळून खाक झाले.

आगीत किराणा माल, इलेक्ट्रिक बोर्ड, फ्रीज, कपड्यांचे लाकडी कौंटर व इतर वस्तू पूर्णपणे जळून गेल्या.

नियमत उल्ला खान हे अत्यंत गरिब कुटुंबातून असून, त्यांचे संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे.

या आगीत त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधारच नष्ट झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

या घटनेबाबत दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related News