“अकोला: शेतकऱ्याच्या घरातून १३ क्विंटल तूर चोरी, ९१ हजारांचे नुकसान; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण!”

"अकोला: शेतकऱ्याच्या घरातून १३ क्विंटल तूर चोरी, ९१ हजारांचे नुकसान; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण!"

अकोल्यातील आपातापा गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घराच्या पोर्चमधून

अंदाजे तब्बल १३ क्विंटल तूर चोरून नेल्याने ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिवस-रात्र मेहनत करून शेतकरी पिकवलेल्या तुरीवर एका क्षणात चोरट्यांनी डल्ला मारला.

Related News

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

आपातापा येथे घडली. प्रमोद बोपटे नामक शेतकऱ्याच्या घराच्या समोरच्या खोलीत ठेवलेले अंदाजे १५ ते २० कट्टे तूर

अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी तुरीसह बारदानाही लंपास केला.याप्रकरणी बोपटे यांनी

बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने रस्त्यावर नाकाबंदी करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना त्वरित अटक करावी,

अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Read more news here :https://ajinkyabharat.com/dahihanda-yatray-madhyay-bhavik-bhaktancha-lakhotya-nakshne-usala-ocean/

 

Related News