दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर धडक कारवाई – ठाणेदारांचा दबदबा

दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर धडक कारवाई – ठाणेदारांचा दबदबा

दहीहांडा प्रतिनिधी

दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर DYSP किरण

भोंडवे यांच्या नेतृत्वात जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे

Related News

धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

दबंग ठाणेदारांची कडक भूमिका

जेव्हापासून दबंग ठाणेदारांनी पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून अवैध वरली मटका,

जुगार, दारू विक्री, गोमांस वाहतूक आणि अवैध

रेती चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे.

तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

कडक कारवाईमागे पोलिसांचा संघटित प्रयत्न

या धडक मोहिमेत PSI संजय इंगळे, पांडे साहेब, चोपडे साहेब, अनिल भांडे साहेब,

मनीष वाकोळे साहेब, लांडे साहेब, विजय चोहान साहेब आणि सर्व पोलीस स्टाफ यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

या कठोर कारवाईमुळे दहीहांडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात

कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/pandharichi-wari-is-maharashtra-sanskriti-habhap-ravindra-maharaj-vankhade/

Related News