ग्राहक आणि पीडित महिला ताब्यात

अकोटातील देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

अकोला :-जिल्ह्यातील अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने अकोट शहरात मोठी कारवाई केली असून देहव्यापाराचा अड्डा उध्वस्त केला गेला आहे. छाप्यात काही ग्राहक आणि विविध ठिकाणांहून आणलेल्या ५ पीडित महिलांना ताब्यात घेतले गेले. या कारवाईत एकूण १ लक्ष ४४ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ चे कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मच्छी मार्केट आणि आठवडी बाजार परिसरात चालत असलेला कुंटणखाना फोडून पोलिसांनी कार्यवाही केली. छाप्यात ग्राहक आरोपी आणि पीडित महिलांकडून रोख रक्कम, सिलबंद व वापरलेले कंडोम, मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले.सदर कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला अनैतिक मानवी वाहतूक कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेही, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट उपविभाग सचिन पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके तसेच अन्य पोलीस कर्मचारी आणि पंच सहभागी होते. या कारवाईमुळे आता आंबट-शौकरांमध्ये खळबळ उडाली आहे.

……पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांविषयी माहिती दिल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल. पुढील तपास अकोट शहर पोलिसांकडून सुरू आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/sajanpuri-nakyavar-hottel-jugnu-madhe-lover-yugalacha-sustainable-dies/

Related News

Related News