जालना -जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध गावात घडलेल्या एका कौटुंबिक वादानं परिसर हादरला आहे.
सततच्या घरगुती वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत पत्नीचं नाव कीर्ती समाधान अलहट (वय 23) तर पतीचं नाव समाधान रंगनाथ अलहट असं आहे.
वादावादी, शिवीगाळ आणि मारहाणीचे प्रकार सतत घडत होते. घटनेच्या दिवशीही वाद चिघळल्याने समाधाननं पत्नीवर प्राणघातक हल्ला केला आणि स्वतःचं
जीवन संपवलं. धक्कादायक म्हणजे, जेव्हा कीर्तीची आई घरात आली तेव्हा दोघेही मृत अवस्थेत आढळले.
सतत वाढते कौटुंबिक खून
अशा घटना केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात वाढत आहेत.
लातेहार : पतीनं लाकडाने डोक्यात वार करून पत्नीचा खून केला.
गोपालगंज : धारदार शस्त्राने पतीकडून पत्नीची हत्या.
मंगळुरू : किरकोळ वादातून पत्नीचा गळा दाबून खून.
ग्रेटर नोएडा : हुंड्यासाठी पत्नीची हत्या.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये हुंडाबळीचे तब्बल 6,450 गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी 80% प्रकरणे उत्तर प्रदेश,
बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांतील होती. म्हणजे दररोज जवळपास 54 महिला हुंड्यासाठी छळ व हत्येचा
बळी ठरल्या.
Read also : https://ajinkyabharat.com/traditional-enthusiasm-aani-thatamat-miravanuk/