क्रिकेटर रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश!

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा ने भाजप मध्ये प्रवेश

केला आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जडेजाने

प्राथमिक सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश केला आहे.

Related News

त्यांची पत्नी रिवाबा जडेजा भाजपच्या सदस्या असून त्या

गुजरातच्या जामनगर मतदारसंघातून पक्षाच्या आमदार आहेत.

जडेजाच्या भाजपा प्रवेशाची बातमी रिवाबाने X या सोशल मीडिया

प्लॅटफॉर्मवर शेअर केली. रिवाबाने तिचे आणि रवींद्र जडेजाची

मेंबरशिप कार्ड शेअर केले आहेत. दरम्यान, रिवाबा यांनी

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘सदस्यत्व मोहिमेची

सुरुवात मी माझ्या घरापासून केली आहे. काल भाजपने सदस्यत्व मोहिमेचा

एक भाग म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

ही मोहीम भाजप शहर व जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात आली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/kaas-plateau-ready-for-rising-uproar/

Related News