क्रिकेटप्रेमींना धक्का ! अखेरचा सामना खेळणार रोहित-विराट?

 वनडे वर्ल्डकपसाठी तरुणांना संधी देण्याची तयारी सुरू

क्रिकेटप्रेमींना धक्का! ऑस्ट्रेलियात करिअरचा अखेरचा सामना खेळणार रोहित-विराट?

मुंबई : टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रोहित शर्माविराट कोहली यांच्याविषयी

धक्कादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, या मालिकेत हे दोघेही आपल्या वनडे करिअरचा अखेरचा सामना खेळतील, अशी जोरदार चर्चा रंगत आहे.

दोन्ही दिग्गजांनी यावर्षी कसोटी आणि टी-२०  फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळत आहेत.

मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, २०२७  वनडे वर्ल्डकपसाठी तरुणांना संधी देण्याची तयारी सुरू असून

त्यामुळे रोहित-विराट यांना या वर्षाअखेर वनडेमधूनही निरोप घ्यावा लागू शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका :

  • १९  ऑक्टोबर – पहिला वनडे (पर्थ)

  • २३  ऑक्टोबर – दुसरा वनडे (एडिलेड)

  • २५ ऑक्टोबर – तिसरा वनडे (सिडनी)

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने संकेत दिले की, कदाचित ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच हे दोन्ही खेळाडू ही आपली शेवटची

एकदिवसीय मालिका असल्याचे जाहीर करतील. त्यानंतर ते इच्छुक असल्यास राज्यनिहाय क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफीत खेळू शकतील.

रोहित आणि विराट यांनी अलीकडील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत निराशाजनक खेळ केला होता, तसेच रणजी ट्रॉफीतही अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती.

त्यामुळे आता त्यांचे वनडे करिअरही संपण्याची शक्यता क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक ठरत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/allice-shrimant-actress-angle/