फटाकेमुक्त आनंदाची दिवाळी : मातोश्री वृद्धाश्रमात साकारला प्रेमाचा झगमगता दीपोत्सव

फटाकेमुक्त

फटाकेमुक्त दिवाळीचा आनंद वृद्धाश्रमात उमलला : धनत्रयोदशीच्या पावन दिवशी आणि दिवाळीच्या उंबरठ्यावर, मातोश्री वृद्धाश्रमाच्या अंगणात एक भावस्पर्शी आणि समृद्ध उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत विचारसाहित्य संमेलन समिती व राष्ट्रधर्म युवा मंच, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेला “फटाकेमुक्त आनंदाची दिवाळी” हा उपक्रम यंदाही वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचा फुलोरा उमटवून गेला.

वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी-आजोबांसाठी दिवाळी अनेकदा एकाकीपणाची आणि अपराधगंडाची ठरते. पण संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या मानवतावादी विचारांनी प्रेरित हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात नवी आशा आणि आनंदाची भावना निर्माण करतो. “भुकेल्याला अन्न आणि एकट्याला सहवास” हेच या कार्यामागचं मुख्य सूत्र आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साह वाढविणारे प्रमुख मान्यवर होते – प्रा. दादाराव पाथ्रीकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी श्री. शरदभाऊ वानखडे, समाजसेवक श्री. गजाननभाऊ हरणे, निवृत्त ट्रेझरी ऑफिसर डॉ. पार्थजी गिरी, डॉ. रामेश्वर बरगट, ज्ञानेश्वर साकरकार, पत्रकार अजय डांगे, सचिन माहोकार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते.

Related News

राष्ट्रधर्म युवा मंचचे जिल्हाध्यक्ष  चंद्रशेखर साबळे, युवती शाखा अध्यक्षा कु. सुरभी दोडके, ऍड. वैष्णवी हगवणे, डॉ. बबलू तायडे,  राजेश गावंडे,पडघामोल , सुशांत निलखन, गाडगे दादा, टेकाम साहेब, आशिष फोकमारे,  निमजे , अंबादास वानखडे, भुजाडे साहेब आदींनी उत्सवाला आत्मीयतेचा रंग भरला.

मातोश्री वृद्धाश्रमाचे मुख्य व्यवस्थापक  युवराज गावंडे व संपूर्ण व्यवस्थापन समितीने या उपक्रमासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ही दिवाळी फटाक्यांच्या आवाजात नव्हे, तर करुणा, आपुलकी आणि सहवासाच्या दीपज्योतीत उजळली. वृद्धाश्रमातील प्रत्येक वृद्धाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून स्पष्ट झाले की खरी दिवाळी तिथेच साकारली गेली.

read also : https://ajinkyabharat.com/notorious-criminal-mithun-alias-monty-caught-with-1-country-made-pistol-and-sword/

Related News