करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;

करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात

करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी नसून त्यांच्यात लिव्ह-इन रिलेशनशिप होती,

Related News

असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.

या प्रकरणातील सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांचे वकील नलिनी चिडंबरम यांनी सांगितले की,

“करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांची पत्नी नव्हत्या. ते दोघं केवळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

त्यामुळे त्यांना कायदेशीर पत्नीचे अधिकार मिळत नाहीत.”

दरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा

आरोप करत मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणावर सुनावणी सुरू असतानाच मुंडे यांच्या वकिलांनी हा दावा

केल्याने कायदेशीर वादाला नवे वळण मिळाले आहे.

या युक्तिवादानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी काही दिवसांवर ठेवली असून,

आता करुणा शर्मा यांची बाजू काय असेल आणि न्यायालय काय निर्णय देईल,

याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला 2 लाख

रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. परंतु करुणा शर्मा यांनी

दर महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी मागितली.

त्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांना लग्नाचे पुरावे देण्याचे आदेश दिले होते.

ते पुरावे आज करुणा शर्मा यांच्याकडून दाखल करण्यात आले.

याबाबत बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लागेल, याची मला खात्री आहे.

धनंजय मुंडे यांनी माझे जीवन रस्त्यावर आणले. आज धनजय मुंडे यांना घरात बसवले आहे.

मी गाडी घेऊन आले त्यावरून हंगामा केला. मला हिरॉईनची ऑफर होती पण मी पती सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

माझ्या सोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० करोड रुपये देणार होते.

मला आणि माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते, असे करुणा शर्मा यांनी म्हटले.

कोर्टात वकिलांचा युक्तीवाद सुरु असताना करुणा शर्मा म्हणाल्या,

धनंजय मुंडे आणि मी २७ वर्षे सोबत होते. माझे वकील चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाही.

ते मी मांडते, असे सांगत करुणा मुंडे यांनी बाजू मांडली. त्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला.

त्यांनी म्हटले करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे लिव्ह इन रिलेशनशिफमध्ये होते,

त्या पत्नी नाही, असा दावा त्यांनी केला होता.

Related News