चालकाचे नियंत्रण सुटल्याने टाटा एस पलटी; तीन महिला जखमी, भाविकांची जीवावर थोडक्यात बचाव

नियंत्रण

रिसोड – लातूर जिल्ह्यातील भाविकांना बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी दर्शनासाठी घेऊन जात असलेले टाटा एस मालवाहू

वाहन पलटी होऊन अपघात झाला. ही घटना 23 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता रिसोड-सेनगाव मार्गावर मुंगसाजी नगरजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले.

या अपघातात सत्यशीला भारत गायकवाड (35, रा. चाकूर जि. लातूर),

लक्ष्मी नामदेव वाघमारे (60, रा. चाकूर जि. लातूर) आणि सुरेखा माणिक वाघमारे (50, रा. जाब ता. चाकूर जि. लातूर)

या तिघी महिला जखमी झाल्या असून त्यांना तत्काळ रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

वाहनात 10 ते 12 प्रवासी होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. सुदैवाने मुलांना मोठी दुखापत झालेली नाही.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत सर्व प्रवाशांना बाहेर काढले.

सदर भाविक मंडळी लातूरहून सैलानीकडे जात होती.

मात्र रस्ता भरकटल्याने वाहन सेनगाव मार्गावर गेले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.

Read also :https://ajinkyabharat.com/aski-computers-yehe-mkcl-cha-sahapsavi-foundation-day-mothaya-excited/