चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई

चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई

चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर

अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,

नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोडी गावातील उपसरपंच

मंगेश घुले यांनी या समस्येची वारंवार तक्रार केली होती,

Related News

मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.

ग्रामस्थ आणि सरपंचांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी

जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

अकोट वरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने

अनेक गावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नाही.

चोहोटा बाजार परिसरातील नागरिक संपूर्णतः

जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.

त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली असून,

आमदार सावरकर यांनीही जलसंपत्ती विभागाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

Related News