ग्रेट ग्रीन वॉल : वाळवंट रोखण्यासाठी चीनची हिरवी भिंत
चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असली, तरी त्याचा सर्वात मोठा शत्रू अमेरिका किंवा भारत नाही, तर त्याच्या हद्दीत पसरलेलं विशाल वाळवंट आहे. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी चीनने ‘ग्रेट ग्रीन वॉल’ नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
चीनचा खरा शत्रू : वाळवंट
शिनजियांग प्रांतातील तकलामाकान वाळवंट दिवसेंदिवस पसरत आहे. या वाळवंटातून उसळणारी वाळू राजधानी बीजिंगपर्यंत पोहोचते. त्यामुळे शेती, उद्योग, आरोग्य आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
जगातील दुसरी सर्वात मोठी भिंत
या धोक्याला तोंड देण्यासाठी चीनने वाळवंटाच्या चारही बाजूंनी हरित पट्टा उभारण्याचा प्रकल्प सुरु केला. केवळ १३ वर्षांत ३,०४६ किलोमीटर लांबीचा हरित पट्टा उभारण्यात आला. ही भिंत जगातील दुसरी सर्वात मोठी भिंत मानली जाते.
लोकसहभागातून साकारलेले स्वप्न
स्थानिक नागरिकांनी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर दुष्काळ सहन करणारी झाडे लावली. वाळूच्या टेकड्यांवर शेती सुरु केली. त्यांच्या प्रयत्नातून वाळवंटाचा विस्तार रोखण्यास मोठे यश मिळाले.
वाळवंट थांबवून पर्यटनालाही चालना
ग्रेट ग्रीन वॉल वाळूची वादळं थोपवते, पर्यावरण वाचवते आणि त्याचबरोबर पर्यटनालाही चालना देते. मंगोलियाच्या तीन वाळवंटांना जोडणारा हा हिरवा पट्टा चीनच्या उत्तर भागाला वाळवंटीकरणापासून संरक्षित करत आहे.
चीनचा दीर्घकालीन कार्यक्रम
या प्रकल्पाचा विस्तार थ्री-नॉर्थ शेल्टरबेल्ट फॉरेस्ट प्रोग्रामच्या माध्यमातून करण्यात येत आहे. चीनसाठी हा वाळवंटावरील विजय एक पर्यावरणीय क्रांती ठरत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/irrigation-viyer-khin-ko-dil-dil-dil-money/
