काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन, नीट घोटाळा, खते-बियाण्यांच्या काळाबाजाराचा निषेध
वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीची समस्या, नीट पेपरफुटीचे प्रकरण,
महिलांची सुरक्षा, खते, बि- बियाण्यांचा काळाबाजार,
Related News
राहुल गांधींच्या ताफ्यात भीषण अपघात! ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक; राहुल गांधी सुरक्षित
राहुल गांधींच्या ताफ्यात अपघात; ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक, राहुल गांधी सुरक्षितउ...
Continue reading
राहुल गांधींना मोठा दिलासा! अमित शाह मानहानी प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; 2018 पासून सुरू होता खटला
सुल्तानपूर, उत्तर प्रदेश : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षन...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
जगावर आर्थिक संकटाचे सावट, भारताची अर्थव्यवस्था मात्र मजबूत; Moody’s ने GDP वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर वाढवला
जगभरात युद्धजन्य परिस्थिती, वाढते ऊर्जा दर, महागाई आणि आर्थिक अनिश्चित...
Continue reading
UPI MDR : 2000 रुपयांवरील व्यवहारांवर 0.4 टक्के शुल्क; वस्तू महागणार की डिस्काऊंट कमी होणार?
15 ऑक्टोबरपासून नवा नियम; ग्राहकांसाठी UPI व्यवहार मात्र मोफतच राहणार, व्यापाऱ्यांवर M...
Continue reading
INDIA आघाडीत मोठी फूट? ममता बॅनर्जींची वेगळी राजकीय चूल; कनिमोळींच्या भेटीनंतर तिसऱ्या आघाडीची चर्चा
देशाच्या राजकारणात 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाड्यांच्या र...
Continue reading
UPI व्यवहारांवर आता शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, ग्राहकांवर किती परिणाम होणार? A टू Z जाणून घ्या
UPI MDR Decision : भारतात डिजिटल पेमेंटचा सर्वाधिक वापर होणाऱ्या UPI व्यवस्थ...
Continue reading
2008 सारखी परिस्थिती पुन्हा ओढवणार? अमेरिकेतील वाढते बॉण्ड यील्ड जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा; भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि जागतिक वित्तीय ...
Continue reading
भारतावर पुन्हा मोठं संकट? महत्त्वाच्या सागरी मार्गाला बायपास करणाऱ्या तेलवाहिनीवर हल्ला; पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बा...
Continue reading
साखरेच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण; सरासरी भाव 60 रुपयांखाली, महाराष्ट्रातही दिलासा
सणासुदीत ग्राहकांना काहीसा दिलासा; मात्र ऑगस्टच्या तुलनेत साखर अजूनही महाग, देशभरात 40 ते 85 ...
Continue reading
कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक
याविरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी
काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले.
अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज स्वराज्य भवन समोर
सकाळी 11 वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’
आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे.
सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असून
महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
राज्यात सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालढकल केली जात असून
अनेक ठिकाणी चिखलामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे.
श्रीमंतांची मुले गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत.
मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत.
सत्ताधारी पक्षाकडून जाती-धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न
सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
राज्य व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी,
दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले
व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या
महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे.
मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे.
स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत,
ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते,
शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही.
कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही,
सरकार किमान भाव देत नाही.
कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण
आणि आर्थिक पिळवणूक करत आहे.
NEET परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे
असा आरोप यावेळी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते, महिला काँग्रेस,
युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सेल व विभाग
यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/ethercha-soon-bidkin-industrial-industrial-colony-construction-project/