मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची नाराजी
मानधन न मिळाल्याने संताप; OTP अडचणींमुळे हजेरीवरही संकट
अकोला :मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तेल्हारा पंचायत समिती परिसरातील प्रशिक्षणार्थी मानधन वेळेवर न मिळाल्याने नाराज झाले असून त्यांनी जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.प्रशिक्षणार्थ्यांनी निवेदनात नमूद केले की, शैक्षणिक वर्ष 2024-25 व 2025-26 या कालावधीत त्यांची जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्ती झाली असून त्यांनी नियमित सेवा बजावली आहे. मात्र जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही.मानधनाबाबत विचारणा केल्यावर कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार प्रशिक्षणार्थ्यांनी केली. उलट, तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असून हजेरी वेळेवर भरली जात नसल्याचा ठपका ठेवला जातो. पंचायत समिती स्तरावर अधिकाऱ्यांची भेट घ्या असे सांगितले जाते, तर पंचायत समिती तेल्हाराचे अधिकारी कलेक्टर ऑफिसकडे धाडतात.प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितले की, हजेरी पोर्टलवर भरण्यासाठी आवश्यक असणारा OTP वेळेवर उपशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळत नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात व हजेरीत विलंब होतो. याची जबाबदारी मात्र प्रशिक्षणार्थ्यांवर ढकलली जाते.प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, थकीत मानधन तात्काळ अदा करावे व OTP संबंधी अडचणी दूर कराव्यात. अन्यथा प्रशिक्षणार्थ्यांच्या मनोबलावर परिणाम होऊन योजना अडखळण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
read also : https://ajinkyabharat.com/yawatma-north-indian-front-district-executive-nivad/
Related News
बौद्ध बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त 200 रुपये प्रतिमाह आजीवन त्याग करा – अजय घनबहादूर
भव्य ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीने कार्यक्रमास सुरुवात
अकोट शहरातील लोहारी मार्गावरी...
Continue reading
सी. एस. परमेश्वर यांची इंडो-अमेरिकन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड
श्री. सी. एस. परमेश्वर, परामिन अॅडव्हर्टायझिंग & मार्केटिंग असोसिएट्सचे
Continue reading
मोठा हल्ला! अफगाण सैन्याने पाकिस्तानवर धडक हल्ला; 12 सैनिक ठार, 5 जखमी, सीमा चौक्या ताब्यात
सैनिक हा शब्द देशाच्या संरक्षणाशी थेट संबंधित आहे. सैनिक म्ह...
Continue reading
अमिताभ बच्चन कोमात होते तेव्हा… रेखा पांढरी साडी नेसून आल्या आणि… जया बच्चन मात्र…
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं प्रेम म्हणजे अमिताभ बच्चन...
Continue reading
अकोला जिल्हा क्रिकेट स्पर्धा 2025: हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाचा गौरव
अकोला जिल्हा पातळीवरील अंडर-17 क्रिकेट स्पर्धेत हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापूरने
Continue reading
मराठमोळी अभिनेत्री मयुरी वाघचा खुलासा: पूर्व पतीकडून मानसिक व शारीरिक छळ, घटस्फोटानंतर पहिल्यांदा मोठा खुलासा
घटस्फोट हा निर्णय कोणत्याही व्यक्तीसाठी सोपा नसतो. लग्नातील समस्या, ...
Continue reading
दिवाळीपूर्वीच मुंबईकरांचा खोळंबा: मध्य रेल्वेवर 30 तासांचा मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. खरेदी, भेटवस्तूंची तयारी आणि सणाच्...
Continue reading
निपाणा येथील बकऱ्या पाणी समजून डांबरात फसल्याने गंभीर जखमी; खाजगी कंपनीवर पशुपालकांचा रोष
अकोला तालुक्यातील निपाणा गावात एका गंभीर प्राणी अपघाताची घट...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं, ‘या’ महिलेने शांततेच्या नोबेल पुरस्कारावर कोरलं नाव
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी...
Continue reading
८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; “शांत राहूनच मी माझी लढाई लढते”
बॉलिवूडची अग्रगण्य अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आहे, आणि यावेळी कारण...
Continue reading
दानापुर-माळेगाव रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात; अपघातांचा धोका वाढला
दानापुर-माळेगाव रस्ता सध्या बंगाली काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकल...
Continue reading
आलेगावात ओबीसी आरक्षणाच्या असुरक्षिततेतून ओबीसी योद्धाची आत्महत्या; परिसरात शोककळा
आलेगाव तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने आज संपूर्ण ओबीसी समाजाला हाद...
Continue reading