सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद

अभिनेत्री

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत असून आता नव्या जोडप्याचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह केला.

दरम्यान, आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यासोबत 26 ऑक्टोबर रोजी तेजस्विनीचा साखरपुडा पार पडला होता. तिच्या मेहंदी व हळदी सोहळ्याचे खास फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.विवाह सोहळ्यात तेजस्विनी गुलाबी रंगाची पैठणी परिधान केलेली दिसली, तर समाधान ऑफव्हाइट रंगाचा शेरवानीमध्ये सजले. मराठी कलाकार आणि राजकीय नेते मंडळींनीही दोघांना लग्नासाठी आशीर्वाद दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विवाह सोहळ्यात उपस्थित राहून नव्या जीवनासाठी खास शुभेच्छा दिल्या. शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांत शिंदेही सोहळ्यात उपस्थित राहून दोघांना शुभेच्छा दिल्या.मराठी सिनेसृष्टीत तेजस्विनीने ‘नो प्रॉब्लेम’, ‘गुलदस्ता’ या चित्रपटांद्वारे आपलं स्थान निर्माण केलं. तसेच ‘देवमाणूस’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली, आता ती सरवणकर कुटुंबीयांची सून म्हणून राजकीय कुटुंबाशी जोडली गेली आहे.

Related News

read also :  https://ajinkyabharat.com/durlabh-prasads-second-wedding-trailer-video-of-mahima-and-sanjay/

Related News