पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवडमध्ये दाखल

तक्रारी जाणून घेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून

पावसाचा जोर चांगलाच आहे. त्यामुळे पुण्यातील धरणे

पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

अशा वेळी पावसाच्या दिवसातच खबरदारी म्हणून

धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे.

त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूर्वपरिस्थिती निर्माण झाली.

प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली गेली. तरी पुरामुळे

नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी नागरिकांच्या सेवेसाठी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले.

त्यांनी पुण्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी

आणि त्यांना मदत करण्यासाठी दौरा नियोजीत केला.

आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा जुनी सांगवी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी केली

आणि पुरग्रस्तांशी चर्चा केली. त्यानंतर शिवाजीनगर भागातील

पाटील इस्टेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय,

पीएमसी कॉलनी वाकडेवाडी या भागात भेट देणार आहेत.

सिंहगड रोड भागात मागील आठवड्यात पाणी सोडल्याने

मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले होते.

त्या भागातील एकता नगरी येथे नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.

त्यानंतर पुणे विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/bangladesh-prime-minister-resigns-army-chief-will-soon-make-a-big-announcement/