Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून सध्या राजकारण तापवण्यात येत आहे.
आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याने तर या वादात आग ओतली आहे. महाराजांच्या सैन्यात मुस्लिम अधिकारी आणि सैनिक नव्हते,
या दाव्यात किती तथ्य आहे.विक्की कौशल याच्या ‘छावा’ चित्रपटाने जगभरात छत्रपती शिवाजी महाराज
Related News
आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची चर्चा होत आहे. आता स्वराज्य आणि त्यातील धोरणांवरून
दावे-प्रतिदावे करत राजकारण करण्यात येत आहे. यामधून विविध समाजात, जातीत
आणि धर्मात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सुद्धा सुरू आहेत. महायुतीमधील दोन मंत्र्यांनी शिवाजी महाराजांवरून वेगवेगळे दावे केले आहेत.
त्यांच्यातच जुंपली आहे. आमदार नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता,
असे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राणे यांचे कान टोचले.
त्यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्ती करत, जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य नकोत असे फटकारले आहेत.
अठरापगड जातींची एक मोट बांधून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले होते. मराठा पातशाही निर्माण केली होती.
सध्या मराठा इतिहासावर प्रकाश टाकणारी काही पुस्तक पुराव्यासह उपलब्ध आहेत. पण ती वाचण्याची तोशीस कोण करतो?
त्रास कोण घेतो? त्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला असता त्याचे काय उत्तर मिळाले, ते पाहूयात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुसलमान सैनिक नव्हता का? काय आहे उत्तर?
सिद्दी इब्राहिम : शिवरायांचा तोफखान्याचे प्रमुख होते. त्यांनी अनेक युद्धात महत्त्वपू्र्ण भूमिका घेतली आहे.
दौलत खान : हे पण महत्त्वाच्या पदावर, शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये होता सहभाग
सिकंदर : छत्रपती शिवाजी महाराजांचा खास अधिकारी, त्यांच्या किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी सिकंदर यांच्यावर होती.
मुस्लिम मावळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात हिंदू आणि मुस्लिम सैनिकांचा सहभाग होता.
तर गनिमी काव्यात सुद्धा अनेक निष्ठावंतर सैनिक आणि सरदारांचा समावेश होता.
स्वराज्याचा पायाच सहिष्णुतेवर
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्मिती केली.
अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. ते प्रत्येक धर्माचा सन्मान करत होते.
त्यांची लढाई ही मुघलांविरोधात होती. त्यांचे युद्ध एका धर्माविरुद्ध नव्हते. त्यांनी कधी मंदिर आणि मशिदीत भेद केला नाही.
त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी हिंदू-मुस्लिम असा भेद करण्यात येत नव्हता.
योग्यता आणि स्वराज्यावरील निष्ठेवर सैन्यात भरती होत होती. त्यामुळेच अनेक मुस्लिमांनी स्वराज्याच्या लढाईत हिरारीने सहभाग घेतला.
अमोल मिटकरी यांचे ते ट्विट चर्चेत
दरम्यान विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यांनी आमदार नितेश राणे यांचे
नाव न घेता शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार, अधिकारी, सैनिकांच्या नावाची यादीच ट्विट केली आहे.
Read more news here: https://ajinkyabharat.com/me-makhup-bhavuk-dhanashrikadun-chalsocabatchaya-ghata-exticate-affairs/