नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत.
स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांची गर्दी एकाएकी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.
तसेत रेल्वेने ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा
केल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जातेय. पण अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांची गर्दी एकाएकी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आहे.
या घटनेच्या तपासासाठी भारतीय रेल्वेने उच्चस्तरित समित गठीत केली आहे.
Related News
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
याअंतर्गत घटनेदरम्यानचे सर्व व्हिडीओ फुटेज राखून ठेवून त्याचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्रयागराजला जाणारी स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वरून सुटणार होती,
परंतु नंतर रेल्वेने अनाउंसमेंट केली की प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरुन ट्रेन सुटणार आहे. मग घडले असे की,
प्लॅटफॉर्म १२ वर वाट पाहणाऱ्या गर्दीने आणि स्थानकाबाहेर वाट पाहणाऱ्या गर्दीने एकाच वेळी प्लॅटफॉर्म १६ वर पोहोचण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दोन्ही प्लॅटफॉर्मवर धक्काबुक्की सुरू झाली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी काही वेगळीच माहिती दिली आहे.
एका अधिकाऱ्याने तर चेंगराचेंगरीसाठी प्रवाशांनाच जबाबदार धरले आहे.
More update here: https://ajinkyabharat.com/way-aaliye-amitabh-bachchans-sarkhan-tech-twit-kartayat-aaye-sangitalam-khar/