चारधाम यात्रा करणार सोपी

चारधाम यात्रा करणार सोपी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

भारतीय रेल्वेने चारधाम यात्रा आता अधिक सोपी आणि आरामदायक करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २७ मेपासून ‘भारत गौरव डीलक्स टुरिस्ट ट्रेन’ सुरु होणार आहे.

Related News

ही ट्रेन १७ दिवसांत बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम आणि द्वारका या चारही धामांची यात्रेची संधी भाविकांना देणार आहे.

१७ दिवसांत ८४२५ किमीचा प्रवास

या प्रवासात भाविकांना बद्रीनाथ, जोशीमठ, मानागाव, नरसिंह मंदिर, ऋषिकेश, पुरीतील जगन्नाथ मंदिर,

कोणार्क सूर्य मंदिर, रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिर, द्वारकाधीश मंदिर, तसेच काशी विश्वनाथ,

भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरांचा समावेश असलेली यात्रा घडवून आणली जाईल.

एकूण ८४२५ किलोमीटरचा प्रवास या ट्रेनने पूर्ण होणार आहे.

ट्रेनमध्ये उत्तम सोयी-सुविधा

भारत गौरव डीलक्स ट्रेनमध्ये दोन डायनिंग रेस्टॉरंट्स, मॉडर्न किचन, स्नानासाठी क्यूबिकल बाथरूम,

बायो टॉयलेट्स यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

याशिवाय फुट मसाजर, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक यांचीही सोय करण्यात आली आहे.

बुकिंग प्रक्रिया कशी?

ही ट्रेन पूर्णपणे एसी असून फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करता येतो.

बुकिंगसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन टिकीट आरक्षित करता येईल.

बुकिंगसाठी “पहिले या, पहिले मिळवा” तत्वावर १५० जागा उपलब्ध आहेत.

पॅकेजमध्ये जर्नी, ३-स्टार हॉटेलमध्ये निवास, तिन्ही वेळचं जेवण, साइटसीइंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि टूर मॅनेजर यांचा समावेश आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे मत

रेल्वेचे कार्यकारी संचालक (प्रचार) दिलीप कुमार यांनी सांगितले की, देशातील

महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी भारत गौरव ट्रेनचे संचालन करण्यात येत आहे.

यामुळे नागरिकांना एका प्रवासात अनेक तीर्थक्षेत्रे पाहण्याची सुवर्णसंधी मिळते आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/taminaduti-machhimaranwar-sri-lankan-lootarunancha-halla/

Related News