चरणगाव येथे शेतकऱ्यांची एक दिवसीय शेवगा लागवड कार्यशाळा संपन्न

चरणगाव येथे शेतकऱ्यांची एक दिवसीय शेवगा लागवड कार्यशाळा संपन्न

पातुर (प्रतिनिधी)

श्रमिक भारती अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, चरणगाव लोकमान्य वाचनालय व ग्रामीण जनहित लोकसेवा

फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगा लागवड विषयक एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Related News

या उपक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेवगा लागवडीचे तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील संधींबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोकराव मेतकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब देशमुख,

हिम्मतराव टप्पे, ज्ञानेश्वर नागलकर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर,

पातुर पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख उपस्थित होते.

मार्गदर्शनासाठी शेतीतज्ज्ञ डॉ. नंदकिशोर देशमुख यांची उपस्थिती लाभली.

कार्यशाळेची सुरुवात कृषीभूषण दादाराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली.

तेजराव देशमुख यांनी शेवगा लागवडीसंदर्भातील तांत्रिक माहितीचे प्रस्ताविक केले.

त्यानंतर डॉ. नंदकिशोर देशमुख यांनी शेतकऱ्यांना बियाण्याची निवड, लागवडीची पद्धत, मशागत,

खत व्यवस्थापन आणि विपणन प्रणाली यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

या कार्यक्रमात श्रीराम टाळे, साहेबराव पाटील, पुंडलिकराव निखाळे, केशवराव माजरे, विश्वासराव खुळे, लक्ष्मण रावतआले,

विजयराव देशमुख, निलेश देशमुख, रामराव इंगळे, राजेश देशमुख, प्रवीण देशमुख, श्रीकांत गाडेकर,

विजय पोरे, प्रदीप देशमुख, संतोष वाघे, बाळासाहेब देशमुख, अविनाश ताळे, मुरलीधर शिरसागर,

अनिल देशमुख, सौ. शिल्पा गजेश देशमुख, आशिष चोरमल आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे संचालन निलेश देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन कंपनीच्या सीओ सौ. शिल्पा गजेश देशमुख यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.

Related News