चंद्रिका नदीला पूर; अमिनापूर-मुंडगाव रस्ता बंद, पूलाच्या प्रतीक्षेत गावकरी

चंद्रिका नदीला पूर; अमिनापूर-मुंडगाव रस्ता बंद, पूलाच्या प्रतीक्षेत गावकरी

अकोट (प्रतिनिधी):

अकोला जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.

मुसळधार पाऊस नसला तरी रिमझिम पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत.

त्यामुळे अकोट तालुक्यातील अमिनापूर ते मुंडगाव मधोमध असलेल्या चंद्रिका नदीला पूर आला आहे.

नदीला पूर आल्याने अमिनापूर ते मुंडगाव हा रस्ता बंद झाला आहे.

या नदीवर दोन्ही गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करत आहेत.

मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akotamadhil-buddhist-smashanbhumi-plight/