चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून

चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून

आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य

पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार

करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Related News

प्रदीप अडागळे (वय अंदाजे ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून त्याच्या

डोक्यात फरशीचा तुकडा मारून हा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

प्रदीप अडागळे याला गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,

मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर चंदननगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आई-पुत्र या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीप्रमाणे, अडागळे हा सतत ऋषी आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत होता.

या वादातूनच रागाच्या भरात दोघांनी मिळून त्याचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/patur-shaharat-ran-kasayanchi-toki-active/

Related News