चाकणमध्ये महिलेला फरफटत निर्जनस्थळी नेऊन बलात्कार;

चाकणमध्ये महिलेला फरफटत निर्जनस्थळी नेऊन बलात्कार;

पुणे जिल्ह्यातील चाकणजवळील मेदनकरवाडी भागात एक महिला कामावर जात

असताना तिच्यावर दहशतजनक स्वरूपाचा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मंगळवारी रात्री ११ वाजता, आरोपीने पीडित महिलेचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ रस्ता अडवला,

Related News

तिला रस्त्यावरून फरफटत नेऊन निर्जनस्थळी बलात्कार केला आणि मारहाण करत धमकी देऊन पसार झाला.

महिलेने आरडाओरडा करत प्रतिकाराचा प्रयत्न केला, पण जवळपास शतपावली करणाऱ्या व्यक्तीला आवाज ऐकू गेला नाही.

काही वेळाने अन्य दोन व्यक्तींच्या मदतीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती देण्यात आली.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे

(मूळगाव: अहिल्यानगर) याला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात आली आहे.

त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, याप्रकरणी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

ही घटना रात्रपाळी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

परिसरात भीतीचं वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू ठेवला आह.

Related News