चैतन्यानंद सरस्वतीच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला असून, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्षणासाठी आलेल्या मुलींवर संस्थेतच शारीरिक, मानसिक आणि भावनिक शोषण होत असल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्यानंदविरुद्ध विविध राज्यांमध्ये पोलिसांचा मोर्चा उघडला असून दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहारमध्ये छापेमारी सुरू आहे. बाबा देशाबाहेर पळू नये म्हणून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पोलिसांकडून पीडित मुलींची सविस्तर चौकशी सुरू आहे. या मुलींच्या कथनातून चैतन्यानंदचे ‘5 डर्टी किस्से’ उघड झाले आहेत: एका मुलीनं सांगितलं, “संस्थेत प्रवेश केल्यानंतर लगेचच बाबाने वाईट मेसेज पाठवायला सुरुवात केली. मला ‘बेबी’ व ‘स्वीट गर्ल’ म्हणायचा, संध्याकाळी ऑफिसमध्ये बोलवायचा. दुबईत घेऊन जाण्याचं आमिष दाखवायचा, पण माझ्यावर दबाव ठेवला. फोन काढून घेतला, कोणाशी बोलण्यासही मनाई केली.” ऑक्टोबर 2024 मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलीनं सांगितलं, “मी दुखापत झाल्यानंतर एक्स-रे रिपोर्ट बाबाला पाठवला. तेव्हापासून त्याने मला अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. ‘बेबी, तू सुंदर दिसतेस’ असं म्हणत मला धमकावत होता. उत्तर न दिल्यास परीक्षेत नापास करेल, असा इशारा मिळाला.”मार्च 2025 मध्ये बाबाने विद्यार्थिनींना त्याच्या बीएमडब्ल्यू कारमधून फिरायला नेलं. रात्री वाईट मेसेज पाठवू लागला. तक्रार केल्यावर मदत मिळण्याऐवजी, डीननेच बाबाला ईमेल करून माफी मागण्यास सांगितलं आणि न केल्यास नापास करण्याची धमकी दिली. एका पीडितेने सांगितलं, “होळीच्या दिवशी बाबाने रंग लावण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केलं. तो सतत ‘बेबी’ म्हणायचा, चुकीचा स्पर्श करायचा. हे केवळ माझ्याबाबतच नाही, अनेक मुलींना सहन करावं लागलं.” बाबाने अनेक मुलींना बळजबरीने ऋषिकेश नेलं. मुलींना जायचं नव्हतं. संध्याकाळी बाबाने खोलीत बोलावून वाईट नजर टाकली. पालकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही अयशस्वी झाले. मुलींवर मानसिक, शारीरिक आणि भावनिक शोषण झालं.
read also:https://ajinkyabharat.com/gurdiche-record-modnaychi-expectation/
