कोकणचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध असून, या सणासाठी लाखो चाकरमानी मुंबई
व उपनगरांतून कोकणात जातात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यंदा 250 गणपती
स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. आता या गाड्यांव्यतिरिक्त आणखी 44
विशेष ट्रेन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दिवा चिपळूण दिवा मेमू दैनिक
अनारक्षित विशेष ट्रेनच्या सेवा वाढवण्यात आल्या असून, 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या
कालावधीत 296 विशेष ट्रेन गणेशभक्तांच्या सेवेत असणार आहेत.
यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.