पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजी
मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील
विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने
Related News
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये पुन्हा वादळ, शिंदे आणि अजितदादा कार्यक्रमातून वगळले
“माचिस नाही दिली म्हणून क्रूर हत्याकांड! दिल्लीत दोन जणांचा पाठलाग करून खून”
BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजना घाडी शिंदे गटात दाखल
वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पेट्रोल पंपवर घटतौलीची तक्रार महागात पडली; ग्राहकाला लाठ्यांनी मारहाण, 3 सेल्समन अटकेत
उमरा येथे बांधकाम कामगारांसाठी ८ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू
थार गाडीच्या टपावर डान्स करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल
हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेलला भीषण आग; SRH संघाची तातडीने सुरक्षित हलवणूक
27 मजली अँटिलियाच्या टॉप फ्लोअरवरच का राहतो अंबानी परिवार? वाचा या आलिशान राजवाड्याच्या काही अनोख्या गोष्टी
विचारांचे दीप पेटवणारा कार्यक्रम : शेकापूर फाट्यावर बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी
भटोरी येथे ट्रॅक्टरखाली दबून वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
देशातील १२ औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली. या निर्णयानुसार,
९ राज्यांमध्ये १२ स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात येणार आहेत.
या माध्यमातून तब्बल १० लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचं
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट
प्रोग्राम (NICDP) अंतर्गत या १२ स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात
येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं
सांगितलं जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार तब्बल २८,६०२ कोटी
रुपयांची गुंतवणूक करणार असून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी
हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली आहे.
देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने सरकारने एक महत्त्वाचे
पाऊल उचलले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने
देशातील १२ औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली. यामध्ये उत्तराखंडमधील खुरपिया,
महाराष्ट्रातील दिघी, केरळमघील पलक्कड, पंजाबमधील राजपुरा-पटियाळा,
उत्तर प्रदेशमधील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणामधील झहीराबाद,
आंध्र प्रदेशमधील ओरवाकल व कोपर्थी, राजस्थानमधील जोधपूर व पाली या
शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/possibility-of-disruption-of-banking-services-to-bank-employees/