“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”

"केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही"

दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति

आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.

या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज्ये’.

Related News

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर केंद्र आणि राज्य सरकारांनी

टीम इंडियाच्या भूमिकेतून एकत्र काम केलं, तर कोणतंही उद्दिष्ट अशक्य नाही.”

ते पुढे म्हणाले की, “विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचं लक्ष्य असायला हवं.

जेव्हा प्रत्येक भारतीय विकसित होईल, तेव्हाच भारतही विकसित होईल.”

पंतप्रधान मोदी हे नीति आयोगाचे पदेन अध्यक्ष आहेत.

या शासी परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल,

तसेच अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, पाकिस्तानातील दहशतवादी तळांविरोधात राबवण्यात आलेल्या

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ही पंतप्रधान मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबतची पहिली मोठी बैठक होती.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukaye-parvana-holder-shopkeepers-are-available-annadhanya-till-june-te-august-2025/

Related News