क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन साजरा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन साजरा

कुरणखेड  कुलस्वामिनी चंडिकादेवी प्रायमरी इंग्लिश स्कूल कुरणखेड मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

जयंती व बालिकादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला,

व यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक अद्भुत अशी नाटिका आणि नृत्य सादर केले. या नाटकाच्या माध्यमातून स्त्रियांसाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

Related News

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रवीण राऊत, प्रमुख पाहुणे विजय देशमुख, कार्यक्रमाची रूपरेषा स्नेहल कोगदे, साधना घोडेस्वार,

सपना तळोकार, राखी गवळी, अर्पिता इंगळे, वृक्षा वानखडे, खुशी सोनोने ह्या शिक्षिका उपस्थित होत्या. कु. समृद्धी नागापुरे हिने

सावित्रीबाई बनवून नाटकाद्वारे सावित्रीबाईची यशोगाथा पटवून दिली.कु. समीक्षा सोळंके, गायत्री चिकार, स्वरूपा राऊत, संचिता इंगळे, श्रेया मोहोड,

आराध्या राठोड, आराध्या समदुरे, ईश्वर सावरकर, प्रिन्स मोहोड, वंश गायकवाड या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/health-checkup-and-blood-donation-camp-completed/

Related News