सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत अंतिम मुदत

सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत अंतिम मुदत

5 मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

अकोट
खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयला चांगला कापूस मिळत आहे.

बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे.

२०२४-२५ या पीक वर्षासाठी किमान आधारभूत किमतीवर कापसाच्या खरेदीसाठी,कॉटन कॉर्पोरेशन ऑफ

Related News

इंडिया लिमिटेडच्या वतीने शाखा कार्यालय अकोला अंतर्गत ६७ केंद्रे सुरू आहेत.राज्यातील सर्व केंद्रांवर चालू पीक

वर्ष २०२४-२५ साठी शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख महामंडळाने १५ मार्च २०२५ निश्चित केली आहे.

म्हणून,१५ मार्च २०२५ नंतर,महामंडळ ज्या शेतकऱ्यांची नोंदणी १५ मार्च २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी झाली आहे

त्यांच्याकडूनच किमान आधारभूत किमतीवर कापूस खरेदी करेल.त्यामुळे सीसीआयच्या वतीने याबाबतचे निर्देश जाहीर केले

असून 15 मार्च पर्यंत सीसीआय अंतर्गत कापूस खरेदीची नोंदणी करता येणार आहे.अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीला कपाशीची

पंढरी म्हणून ओळखल्या जाते त्यामुळे अकोट अकोट तालुक्यात विविध भागांमधून येणारी कपाशी मोठ्या प्रमाणात

असून कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी 15 मार्च पूर्वी सीसीआय कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/telhara-yehe-mahabodhi-mahavihar-mukisathi-movement/

 

Related News