नवी दिल्ली | १३ मे २०२५
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडासा चांगला आहे.
2024 मध्ये पास टक्केवारी 87.98% होती, तर यंदा त्यात 0.41% ची वाढ झाली आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
परीक्षेचा तपशील:
-
एकूण नोंदणी: 17,04,367 विद्यार्थी
-
परीक्षेला बसले: 16,92,794 विद्यार्थी
-
उत्तीर्ण विद्यार्थी: 14,96,307 विद्यार्थी
-
सर्वोत्तम टक्केवारी: 88.39%
मेरिट लिस्ट नसेल, पण डिस्टिंक्शन मिळेल
सीबीएसईने यंदाही टॉपर यादी जाहीर केलेली नाही. बोर्डचे मत आहे की अशा यादीमुळे अनावश्यक स्पर्धा वाढते.
मात्र, 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘डिस्टिंक्शन’ मानून गौरवण्यात येणार आहे.
असे पाहा CBSE 12वीचा निकाल:
-
अधिकृत वेबसाइटवर जा: https://cbseresults.nic.in
-
“Senior School Certificate Examination (Class XII) 2025” या लिंकवर क्लिक करा
-
आपला रोल नंबर, शाळेचा नंबर आणि अॅडमिट कार्ड आयडी टाका
-
‘Submit’ बटणावर क्लिक करा
-
निकाल स्क्रीनवर दिसेल – तो डाउनलोड व प्रिंट करून ठेवा
निकाल कुठे पाहता येईल:
-
UMANG App (मोबाइल अॅपद्वारे)
Read Also : https://ajinkyabharat.com/rawpindi-lahorchaya-rugnalayant-ghay-jawan-gardi/