[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
'मराठीला गोळी मारा', नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

‘मराठीला गोळी मारा’, नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

Vasai Woman Threat : तुमचे फ्लॅट्स विकून दुसरीकडे जा नाहीतर तुम्हाला आम्ही मानसिक त्रास देऊ अशी सोसाटचीच्या सेक्रेटरीने आणि कमिटीने धमकी दिली असल्याची तक्रार महिलेने केली आहे. पा...

Continue reading

उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बैठकीत सांगितले की, लोकसभेच्या जागांचे परिसीमन तलवारीसारखे लटकत आहे. भाजप सरकार कोणताही विचारविनिमय न करता या विषयावर पुढे जात आहे. दक्षिणेतील जागा कमी आणि उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. उत्तरेत त्यांचा प्रभाव आहे. चार राज्यांचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सहभागी या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास आणि बिजू जनता दलाचे नेते संजय कुमार दास बर्मा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

“दक्षिणेत महायुतीचा शक्तीप्रदर्शन; उत्तरचेही नेते एकवटले!”

लोकसभा आणि विधानसभा जागांच्या सीमा नव्या पद्धतीने ठरवण्याच्या प्रक्रियेला परिसीमन म्हणतात. यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला आहे. 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये सीमांकन आयोग स्था...

Continue reading

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात (Prashant Koratkar) लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. तसंच ब्युरो ऑफ इमिंग्रेशनकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जात आहे. प्रशांत कोरटकर फरार असून तो देश सोडून दुबईला गेल्याची चर्चा आहे. नागपूरच्या प्रशांत कोरटकरने कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या तक्रारीनंतर कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार असून त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा नाही. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा असून त्याला पुष्ठी देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्चला फेटाळला गेला. अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण आता तो देश सोडून गेल्याची चर्चा आहे. विरोधकांकडून टीकेचा आसूड कोटरकर प्रकरणी खासदार संजय राऊतांनी नागपूरच्या पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी खासदार राऊतांनी केली. संशयित आरोपीने देश सोडून जाणं गंभीर असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर पोलिसांनीच कोरटकरला पळायला मदत केली असेल असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. महाराजांचा अपमान करणारा विकृत माणूस देशातून पळून जातो, कारण फडणवीसांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचं ठरवलंय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. प्रशांत कोरटकर दुबईला जावो की कुठेही जावो, पोलीस त्याला शोधून काढतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रशांत कोरटकरचा पासपोस्ट जप्त करा अशी मागणी करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे. कोरटकरच्या कथित पलायनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हा अर्ज दाखल केला. प्रशांत कोरटकर प्रकरणात एबीपी माझाचे प्रश्न 1. एक महिना होत आला, प्रशांत कोरटकरला धमकी प्रकरणात अटक का नाही? 2. प्रशांत कोरटकर महाराष्ट्र पोलिसांपेक्षाही मोठा आहे का? 3. प्रशांत कोरटकरला अटक होऊ नये यासाठी पोलीसच प्रयत्नशील आहेत का? 4. कोरटकरला अटक न करण्यानं पोलिसांची बदनामी होत नाही का? 5. खरंच,प्रशांत कोरटकरला कुणी पाठीशी घालतंय का? 6. कोरटकरला अटक करु नये असे वरिष्ठांचे पोलिसांना निर्देश आहेत का? 7. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतची मैत्री कोरटकरला फायद्याची ठरतेय का? 8. कोरटकरसारख्या 'चिल्लर'व्यक्तीचा ठावठिकाणा लागू नये एवढे पोलीस निष्क्रिय आहेत का? 10. प्रशांत कोरटकरला कधीच अटक होणार नाही का?

Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी, कुठे-कुठे प्रवास केला याची माहिती घेणार

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिस नागपूरमध्ये ठाण मांडून असले तरी त्यांना नागपूर पोलिसांकडून सह कार्य केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. अशात आता प्रश...

Continue reading

Nagpur Violance : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ईरफान अंसारी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून नागपुरातील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) ईरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी झालेल्या हिंसाचारात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचार दरम्यान मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडले आहे. किंबहुना या घटनेने नागपूर हिंसाचाराचा (Nagpur Violance) पहिला बळी आज अन्सारी ठरल्याचे पुढे आले आहे. नागपुरात गेल्या सोमवारी(17 मार्च) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला. दोन गटात झालेल्या राड्यानंतर शहरात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे बघायला मिळाले. यात दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत पोलिसांसह नागरिकही जखमी झाले. दंगलीनंतर या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना या हिंसाचाराची दाहकता ही समोर आली आहे.

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडला

Nagpur : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माह...

Continue reading

Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Bhide guruji Dharkari: संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी दिल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिवसाला धमकीचे 100 फोन येत असल्याची तक्रार मुंबई:...

Continue reading

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma ) यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court) करण्य...

Continue reading

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री? हा निर्णय चुकीचा असल्याचं केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलंय. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. अशा निर्णयामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले. अलाहबाद उच्च न्यायायलाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दोन व्यक्तींच्या बाजूने निकाल दिला. बलात्काराच्या आरोपाखाली त्यांना समन्स बजावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आप खासदारही संतापल्या माजी डीसीडब्ल्यू प्रमुख आणि आप खासदार स्वाती मालीवाल यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे खूप दुर्दैवी आहे. निकालपत्रात केलेल्या टिपण्णीने मला खूप धक्का बसला आहे. ही खूप लज्जास्पद असल्याचे स्वाती मालीवाल म्हणाल्या. त्या पुरूषांनी केलेले कृत्य बलात्काराच्या श्रेणीत का येत नाही? या निर्णयामागील तर्क मला समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे आवाहनही आप खासदार स्वाती मालीवाल यांनी केले. ' आरोपींवर POCSO कायद्याचे कलम 18 लावलेच नाही' आरोपी पवन आणि आकाशवर कासगंज ट्रायल कोर्टाच्या निर्देशानुसार सुरुवातीला बलात्काराच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 18 अंतर्गत खटला चालवला जाणार होता. असे असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने आरोपीवर कलम 354-ब आयपीसी (वस्त्र उतरवण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 9/10 (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत खटला चालवण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने निर्णय देताना काय म्हटलं? आरोपी पवन आणि आकाश यांच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि प्रकरणातील तथ्ये या प्रकरणात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरवत नाहीत, असे खंडपीठाने म्हटले. बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यासाठी अभियोजन पक्षाने हे सिद्ध केले पाहिजे की, ते तयारीच्या टप्प्याच्या पलीकडे गेले आहे. तयारी आणि गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न यातील फरक प्रामुख्याने जास्त प्रमाणात दृढनिश्चयात असतो, असे खंडपीठाने म्हटले.

‘लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय…’ उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!

Allahabad High Court Decesion: अलाहबाद हायकोर्टच्या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला. Allahabad High Court Decesion: अलाहब...

Continue reading

संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका

संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका

Pankaja Munde : एबीपी माझाच्या  'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'  या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली आहे. . Pankaja Munde :  संतोष देशमुख य...

Continue reading

राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्र्यातील भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आता, आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji maharaj) स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता, या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील ज्या ठिकाणी कैद राहिलेले ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहित करणार आहे. या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्र्यातील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही याठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालय आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत. देशभरातली पर्यटकांसाठी प्रेरणास्थान बनेल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते. आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहीले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र, या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार ‘लय भारी’

स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (D...

Continue reading

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: 'दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि...', दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा 'तो' धक्कादायक खुलासा...

Continue reading