[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma ) यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court) करण्य...

Continue reading

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री? हा निर्णय चुकीचा असल्याचं केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलंय. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. अशा निर्णयामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले. अलाहबाद उच्च न्यायायलाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दोन व्यक्तींच्या बाजूने निकाल दिला. बलात्काराच्या आरोपाखाली त्यांना समन्स बजावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आप खासदारही संतापल्या माजी डीसीडब्ल्यू प्रमुख आणि आप खासदार स्वाती मालीवाल यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे खूप दुर्दैवी आहे. निकालपत्रात केलेल्या टिपण्णीने मला खूप धक्का बसला आहे. ही खूप लज्जास्पद असल्याचे स्वाती मालीवाल म्हणाल्या. त्या पुरूषांनी केलेले कृत्य बलात्काराच्या श्रेणीत का येत नाही? या निर्णयामागील तर्क मला समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे आवाहनही आप खासदार स्वाती मालीवाल यांनी केले. ' आरोपींवर POCSO कायद्याचे कलम 18 लावलेच नाही' आरोपी पवन आणि आकाशवर कासगंज ट्रायल कोर्टाच्या निर्देशानुसार सुरुवातीला बलात्काराच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 18 अंतर्गत खटला चालवला जाणार होता. असे असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने आरोपीवर कलम 354-ब आयपीसी (वस्त्र उतरवण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 9/10 (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत खटला चालवण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने निर्णय देताना काय म्हटलं? आरोपी पवन आणि आकाश यांच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि प्रकरणातील तथ्ये या प्रकरणात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरवत नाहीत, असे खंडपीठाने म्हटले. बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यासाठी अभियोजन पक्षाने हे सिद्ध केले पाहिजे की, ते तयारीच्या टप्प्याच्या पलीकडे गेले आहे. तयारी आणि गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न यातील फरक प्रामुख्याने जास्त प्रमाणात दृढनिश्चयात असतो, असे खंडपीठाने म्हटले.

‘लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय…’ उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!

Allahabad High Court Decesion: अलाहबाद हायकोर्टच्या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला. Allahabad High Court Decesion: अलाहब...

Continue reading

संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका

संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका

Pankaja Munde : एबीपी माझाच्या  'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'  या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली आहे. . Pankaja Munde :  संतोष देशमुख य...

Continue reading

राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्र्यातील भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आता, आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji maharaj) स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता, या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील ज्या ठिकाणी कैद राहिलेले ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहित करणार आहे. या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्र्यातील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही याठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालय आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत. देशभरातली पर्यटकांसाठी प्रेरणास्थान बनेल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते. आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहीले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र, या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार ‘लय भारी’

स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (D...

Continue reading

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: 'दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि...', दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा 'तो' धक्कादायक खुलासा...

Continue reading

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

NIA team in Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. त्यातच नागपूरमध्ये हिंसाचार उफळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मराठवाड्यातील...

Continue reading

Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

Hingoli Accident News : गणेश दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा...

Continue reading

अंबरनाथमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी उपोषण; अधिकार्‍यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन

अंबरनाथमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी उपोषण; अधिकार्‍यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन

Ambarnath Water Issue : माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.निनाद करमरकर, अंबरनाथ Ambarnath News : अंबरनाथच्या शिव...

Continue reading

सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया असंच पाहायला मिळत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे, शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी घोषणाच माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात आज केली. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडून आर्टिफिशियल इंटिलिजन्स संदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर मंत्री शेलार यांनी उत्तर दिले. दरम्यान, यावेळी शेलार (Ashish shelar) यांनी एआयचा मजेशीर किस्साही सांगितला. त्यावरुन, आमदार अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच मिश्कीलपणे जुबलबंदी रंगली. केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. चांगल्या दृष्टीने शिक्षणात हे येणे क्रांती ठरेल, आपण यासंदर्भात एक समग्र धोरण आणावं, असा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावर, आता आशिष शेलार यांनी सभागृहात उत्तर दिले. एआय ही उद्याची भाषा जी जगाने ठरवली आहे, दीड दोन आठवड्यात एकच चर्चा लावली आहे. जगातील नवीन संधी आणि आव्हानांचे स्वरुप एआयच्या रुपाने आलेलं आहे. संशोधन, रोजगार निर्मिती ज्ञान मिळवण्याची व्यवस्था आपण इंटरनेट आल्यानंतर बघितली. एआयच्या सहाय्याने सर्वत्रच मूलभूत क्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग हे आव्हान आहे की अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. सन 2024 ला नीती आयोग, केंद्रातील विभाग, तज्ज्ञांकडून भारतीय एआय धोरण लाँच केलं गेलं. आता, आपण यासंदर्भात टास्क फोर्स बनवला आहे, एआयचा उपयोग होणार असेल तर नेमकं होणार काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे, राज्याची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. शिक्षणात पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नियम धोरण बनवावे लागेल, त्यासाठी समिती नेमू. शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि शिक्षक हे सर्व त्या समितीमध्ये असतील,असेही शेलार यांनी यावेळी, सांगितले. एआय पालकमंत्रीवरुन जुगलबंदी राज्याच्या एआय धोरणाबाबत विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना एआयचे परिणाम आणि दुष्परिणामावर चर्चा सुरू होती. त्यावेळी पालकमंत्रीपदाबाबत आपण प्रश्न विचारला होता, कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळणार असा प्रश्न मी एआयला विचारलं होता, असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले. तेव्हा एआयने सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील 80 टक्के जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमले गेल्याचे उदाहरण आशिष शेलार यांनी सभागृहात दिले. शेलार यांच्या या उदाहरणावर अनिल परब यांनी मिश्लिल टोला लगावला. नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री देखील एआयला निवडायला सांगा, असे परब यांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकला. तर, एआय तो तिढा सोडवू शकणार नाही, असं आशिष शेलार यांनीही गमतीत म्हटलं. त्यावर तिथे एआय नाही तर आय-माय आहे असे अनिल परब यांनी म्हटले. तर आय माय नाही "आयना का बायना" आहे, असे उत्तर पुन्हा आशिष शेलार यांनी दिले. त्यामुळे, एआय आणि पालकमंत्री पदावरुन विधानपरिषदेत चांगलीच मिश्कील जुगलबंदी पाहायला मिळाली. दरम्यान, यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते

एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला

केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया ...

Continue reading

मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख"

मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख”

यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख य...

Continue reading