[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
पुणे: पुणे शहरातील चंदननगर परिसरामध्ये पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी भांडण आणि तिच्यावर असलेल्या संशयातून पतीने चाकूने गळा चिरून मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (शुक्रवारी दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घ्यायचा अन्... चंदननगर परिसरातमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी माधव आणि त्याची पत्नी स्वरूपा हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा आयटी कंपनीत कामाला आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होतं. तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजामुळे हिंमत झोपेतून उठला. दुपारी साडेबारा वाजता माधव घरातून बाहेर पडत असताना त्याने मुलीला घेऊन येतो म्हणून घरातून निघाला सोबत मुलाला घेऊन निघाला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातुन धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. त्याने मुलाला तिथेच टाकलं आणि तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. त्याने भरपूर दारू प्यायली होती. मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. शुक्रवारी पुन्हा आरोपीकडे कसून तपास केल्यावर मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती दिली . असा झाला खुनाचा उलगडा माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, पोलिस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले. दुकानातून चाकू, ब्लेड विकत घेतलं तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यामध्ये माधव मुलगा हिम्मत याला घेऊन जाताना दिसत आहे. तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावने तीनच्या सुमारास मुलगा हिम्मतचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.

‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत, तीन वर्षांच्या मुलाला घेऊन गेला त्याला संपवलं अन्…दारू पिऊन लॉजवर गेला

Father kills son: फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आह...

Continue reading

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही…; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. Nanded Crime : आमच्...

Continue reading

दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

केळं हे वर्षभर उपलब्ध असलेलं आणि सहज परवडणारं फळ आहे. बहुतांश घरांमध्ये केळी आढळतात, आणि काही लोक तर रोजच त्याचं सेवन करतात. पण दररोज केळी खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? ...

Continue reading

पुण्यातील हिंजवडीत काल (बुधवारी, ता 20) सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसच्या चालकानेच सहकारी कामगारांच्या त्रासाला कंटाळून आग लावल्याचं संतापजनक कारण समोर आलं आहे. चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर आता हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याच्याविरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात आरोपी जनार्दन याला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप, त्याच्या पत्नी आणि भावाने केला आहे. वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही... आरोपी जनार्दन हंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल उपस्थित करत ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भावजी देखील होते, त्यामुळे ते आग कशी लावतील शिवाय घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही, त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणतांना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत, जनार्दन हंबर्डीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. माझा भाऊ निर्दोष असताना देखील त्याला या प्रकरणात गोवलं जात आहे. जर त्याने ते केमिकल कंपनीतून घेतल्याचा दावा केला जातो. पण, ज्या कंपनीतून एक छोटा कागद घेऊन जाऊ शकत नाही त्या कंपनीतून त्याने हे केमिकल कसं नेलं. ते कॅन नेत असताना त्याला का अडवलं गेलं नाही. हा माझा अक्षेप आहे. सकाळीपासून तो स्टेबल नसताना पोलिसांनी त्याची दोन ते अडीच तास काय माहिती घेतली. त्याची स्थिती ठिक नसताना पोलिस त्याच्याकडून अडीच ते तीन तास स्टेटमेंट घेतात. त्या गाडीमध्ये एक महिला आणि बाकी सर्व पुरूष होते. जर त्याने गाडी लॉक केली तर त्यामध्ये तीन लोक असे आहेत की त्यांना खरचटल देखील नाही. जर त्याने दरवाजा लॉक केला असताना तर मग हे लोक कसे बाहेर आले, असा सवाल चालक जनार्दन हंबर्डीकरचा भाऊ यांनी म्हटलं आहे. त्या बसमध्ये माझे भाऊजी गाडी लॉक होती तर इतर वाचलेले सहा ते सात जण बाहेर कसे आले मग? दरवाजा उघडा नव्हता तर बाकी कसे बाहेर आले असते. एखादा दुसरा खिडकी तोडून बाहेर आले असते. पण सगळेच खिडकी तोडून बाहेर आले नसते, त्या बसमध्ये माझे भाऊजी विश्वास खानविलकर देखील होते. ते सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते सर्वात शेवटी बाहेर पडले होते. दरवाडा उघडा होता त्यामुळे ते बाहेर पडले. असा कोणता भाऊ असेल जो आपल्या बहिणीचं कुंकू पुसायला तयार असेल. माझा भाऊ निर्दोष आहे. आम्हाला न्याय मिळावा, असं विजय हंबर्डीकर चालक जनार्दन हंबर्डीकरच्या भावाने म्हटलं आहे. पत्नी काय म्हणाली? जी कारणे सांगितली जात आहेत. बोनस मिळाला नाही इतर काही गोष्टी त्यापैकी काहीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं नाही. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला पैसे दिले नसते. ते कामाला जातात तसे मी त्यांना सकाळी सहा वाजेपर्यंत डब्बा बनवून देत होते. ते शुगर पेशंट होते. ते 2006 पासून तिथे होते. जर त्या कंपनीतील लोकांना ते केमिकल घेऊन जाताना दिसले तर त्यांनी त्याबद्दल विचारायला हवं होतं. त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. नक्की काय खरं आहे खोटं आहे याचा तपास झाला पाहिजे माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे असंही चालकाची पत्नी नेहा हंबर्डीकरने मागणी केली आहे.

माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जातंय, जळालेल्या बसमध्ये चालकाचे सख्खे भावोजी; हंबर्डीकरांच्या पत्नीचा दावा, नेमकं काय सांगितलं?

Pune Hinjwadi Bus Fire: आरोपी जनार्दन हंबर्डीकर पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविलाच कसा असा सवाल उपस्थित करत त्याच्या पत्नी अन् भावाने त्याला या प्रकरणात गोवलं ...

Continue reading

बारोट व्हॅलीची खासियत आम्ही तुम्हाला सांगतो की बारोट गाव 1920च्या दशकात शानन जलविद्युत प्रकल्पासाठी बांधण्यात आले होते. पण आज ते एक पर्यटन स्थळ बनले आहे. स्वातंत्र्यापूर्वी, बारोट हा कुल्लू खोऱ्याला कांगडा खोऱ्याशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग होता. पूर्वी हा मार्ग खेचरांच्या वापरासाठी ओळखला जात होता. पण आता हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या, थंड वारे, देवदारचे घनदाट जंगल आणि ॲडवेंचर ॲक्टिव्हिटी साठी ओळखले जाते. बारोट व्हॅलीमध्ये देवदारचे उंच घनदाट जंगल, थंड वारे आणि बर्फाच्छादित पर्वत आहेत जे त्याला स्वर्ग बनवतात. मनाली आणि शिमला प्रमाणे इथे गर्दी कमी आहे. जर तुम्हाला एकटे काही शांत क्षण घालवायचे असतील तर बारोट व्हॅली तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बजेट फ्रेंडली देखील आहे. बारोट व्हॅली म्हणजेच मिनी स्वित्झर्लंडमध्ये काय पहावे? बारोट व्हॅलीमध्ये सुंदर धरणे आहेत. तुम्हाला धबधबे, सूर्यास्ताचे सुंदर दृश्य आणि नद्या पाहायला मिळतील. येथील उहल नदीत शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी मासेमारी करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील बारोट व्ह्यू पॉइंटवरून तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय पाहू शकता. नेहरा ट्रॅकवर जाऊन तुम्ही खूप ॲडवेंचर करू शकता. तसेच या ठिकाणी तुम्हाला हिमाचल गावांची संस्कृती आणि जीवनशैली जवळून पाहता येईल. जर तुम्ही इथे आलात तर घनदाट जंगलात ट्रेकिंग करायला विसरू नका. घनदाट जंगलातून ट्रेकिंग केल्याने तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. बारोट व्हॅलीला कसे पोहोचायचे? बारोट व्हॅलीपर्यंत पोहोचणे देखील खूप सोपे आहे. तुम्हाला दिल्लीहून जोगिंदर नगरला थेट बसने जावे लागेल. जोगिंदर नगरला पोहोचल्यानंतर, 35 किमी पुढे असलेल्या या दरीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्थानिक बस किंवा टॅक्सी देखील मिळेल. येथे प्रवास करण्याचे बजेटही खूपच कमी आहे. तुम्ही फक्त 4-5 हजार रुपयांमध्ये हे सुंदर ठिकाण एक्सप्लोर करू शकता.

भारताचे हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ तुम्ही पाहिलंत का? असा बनवा तेथे फिरण्याचा प्लॅन

तुम्ही अशा जागेच्या शोधात असाल जिथे पर्वतांचे सौंदर्य, हिरवळ आणि गर्दीपासून दूर शांत वातावरण असेल. आम्ही तुमच्यासाठी मनालीपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेले एक अद्भुत ठिकाण आहे...

Continue reading

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंचाचा निर्घृण खून ! चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले अशी माहिती समोर आली आहे. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच सं...

Continue reading

तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि दररोज सकाळी त्यांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, तथापि, तुम्हाला हे बियाणे कसे खावे हे माहित असले पाहिजे.भोपळ्याच्या ...

Continue reading

काय आहे प्रकरण? बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माऊली माने, कुणाल घाडगे, शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी कृष्णाला एकटे घाटात दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत मारहाण केली.. तसेच तू आता गावातच राहायचे नाही अशी धमकी देखील दिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात होती. गुन्हा दाखल असला अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अंबाजोगाई येथील दस्तगीरवाडी इथला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा साळे नावाच्या तरुणाला 3 तरुणांनी मारहाण केली. या मुलाला काही या तीन मुलांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे. 'इथं काय दादागिरी करायला का, खपवून घेणार नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. फोन कर' असं म्हणत लाथा बुक्याने या तरुणाला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे. अंजली दमानियांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये, "बीडच्या आंबेजोगाई मधे पुन्हा मारहाण। तुला खल्लासच करतो म्हणत कृष्णा साळे, या दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला. पोलीसांनी अट्रॉसिटी एक्ट खाली गुन्हा नोंदवला. एकाला अटकही झाली. पण बीडचे काही तरुण सुधरत नाहीत असे दिसतय, एसपी नवनीत कावत यांचे आभार", लिहलं आहे.

Beed Viral video: ‘आम्ही कुणाला भीत नाय, तुला खल्लासच करतो’; बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Beed Viral video: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी मिळून मुलाला लाथा-बुक्यांनी मारलं; बीडमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल, दमानियांनी व्यक्त केला संताप...

Continue reading

न्याहारीपूर्वी ब्रश केल्याने तोंड ताजे राहते आणि बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. न्याहारीनंतर लगेच ब्रश करणे टाळावे. जर तुम्हाला न्याहारीनंतर ब्रश करायचा असेल तर तुम्ही किमान 30 मिनिटांचे अंतर ठेवावे.

ब्रश करण्यापूर्वी की ब्रश केल्यानंतर? नाश्ता कधी करावा, जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर!

जाणून घेऊया योग्य पद्धत काय आहे, कारण चुकीच्या पद्धतीमुळे तुमचे दात खराब होऊ शकतात तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आधी दात घासता आणि नंतर नाश्ता करा किंवा तुम्ही आधी नाश्ता करा आणि मग दा...

Continue reading

नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद, म्हणाले...

नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद, म्हणाले…

CM Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद; तब्येतीची चौकशी करून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा ...

Continue reading