“कार्बनमुक्त प्रवासाकडे भारताची झेप

भारताची झेप

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज; लवकरच धावणार जिंद–सोनीपत मार्गावर

नवी दिल्ली | – यशस्वी चाचणीनंतर भारतीय रेल्वे आता देशातील पहिली शून्य-प्रदूषण हायड्रोजनवर चालणारी रेल्वे धावविण्यास सज्ज झाली आहे.

चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तब्बल १३६ कोटी रुपयांच्या खर्चाने ही अत्याधुनिक गाडी बनविण्यात आली

असून हरियाण्यातील जिंद–सोनीपत मार्गावर ती लवकरच धावणार आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

प्रवासी क्षमता : दररोज सुमारे २,६०० प्रवासी या गाडीचा लाभ घेऊ शकणार.

मार्ग : एकूण ३५६ किमी अंतराची सेवा.

पर्यावरणपूरक झेप : हायड्रोजनवर धावणारी असल्यामुळे या गाडीमुळे शून्य उत्सर्जन (Zero Emission) होईल.

त्यामुळे भारत हा हायड्रोजनवर आधारित रेल्वे तंत्रज्ञान वापरणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक ठरणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भारताच्या “कार्बन न्यूट्रॅलिटीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा” ठरवले आहे.

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून ही गाडी हरित व शाश्वत प्रवासाचा नवा अध्याय लिहिणार आहे.

भारताच्या नेट झिरो २०७० लक्ष्यपूर्तीच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वाची झेप ठरणार असून देशाच्या स्वदेशी हरित तंत्रज्ञान क्षमतेचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/contaminated-panipurvathyamue-degavat-arogyacha-question/