श्रीलंकेत झालेल्या भीषण केबल कार अपघातात वर्ध्याच्या तळेगाव मानव विकास साधना आश्रमचे बौद्ध भिक्षु प्रफुल्ल वाकदरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक वर्षाच्या धम्म विनय साधनेसाठी गेलेले वाकदरे बुधवारी (२४ सप्टेंबर) रात्री अपघातग्रस्त रोप-वे मध्ये प्रवास करीत असताना या दुर्घटनेत प्राण गमावले.मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील मेलसिरीपुरा येथील पानसियागामा येथील ना उयाना अरण्य सेनानाया मठात १३ बौद्ध भिक्षु केबल कारमधून प्रवास करत होते. दरम्यान अचानक केबल तुटून कार खाली कोसळली. यात किमान ७ भिक्षु जागीच ठार झाले, त्यात दोन परदेशी भिक्षुंचा समावेश आहे. मृतदेह कुरुनेगाला व गोकरेल्ला जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.या अपघाताची बातमी वर्धा जिल्ह्यात कळताच तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रफुल्ल वाकदरे यांचा मृतदेह भारतात आणावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
केबल कारचा भीषण अपघात

25
Sep