बापाचा छळ अन् मुलाचा सूड! जळत्या स्कॉर्पिओतील 4 मृत्यूंचं धक्कादायक सत्य उघड
राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासात उघड झालेले सत्य इतके भयानक आहे की ते ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. जळत्या स्कॉर्पिओमध्ये सापडलेले चार सांगाडे हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या हत्याकांडाचा सूत्रधार दुसरा कोणी नसून मृत व्यक्तीचाच 17 वर्षीय मुलगा असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
अजमेर जिल्ह्यातील बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अराई रोडवर गुरुवारी सकाळी एक स्कॉर्पिओ गाडी जळालेल्या अवस्थेत आढळली. गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. त्यामध्ये चार सांगाडे सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला शॉर्ट सर्किट किंवा अपघातामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या.
Related News
जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाला यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तपास जसजसा पुढे गेला तसतसे या प्रकरणाचे धागेदोरे एका भयावह कौटुंबिक कटाकडे वळू लागले.
दोन लग्नांमुळे घरात सतत वाद
मृत व्यक्तीची ओळख माजी सरपंच रामसिंह चौधरी अशी झाली. रामसिंह यांनी 2005 मध्ये सुनीता यांच्याशी पहिले लग्न केले होते. त्यांना दोन मुलेही होती. मात्र 2019 मध्ये त्यांनी सुरज्ञान नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. या दुसऱ्या लग्नानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले.
पहिली पत्नी आणि तिच्या मुलांना सतत दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप आहे. घरात सतत भांडणे, मारहाण आणि मानसिक छळ सुरू होता. विशेषतः दारूच्या नशेत रामसिंह पत्नीला अमानुष मारहाण करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या 17 वर्षीय मुलाच्या मनात वडिलांविषयी प्रचंड संताप निर्माण झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो हा त्रास सहन करत होता.
सूडाच्या भावनेतून रचला खुनाचा कट
पोलिसांच्या चौकशीत आरोपी अल्पवयीन मुलाने अत्यंत धक्कादायक कबुलीजबाब दिला. वडिलांच्या सततच्या छळाला कंटाळून त्याने त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन चाकू मागवला होता.
27 मे रोजी रात्री पुन्हा एकदा घरात मोठा वाद झाला. त्यानंतर सर्वजण झोपल्यानंतर आरोपी मुलाने वडिलांवर हल्ला केला. झोपेत असतानाच त्याने वडिलांचा गळा चिरला. मात्र या घटनेदरम्यान आवाज झाल्याने सावत्र आई जागी झाली. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने तिचीही हत्या केली.
यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या भीतीने त्याने आजी आणि चुलत बहिणीलाही ठार मारल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कटात आरोपीची आई आणि बहिणीनेही त्याला मदत केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
मृतदेह स्कॉर्पिओमध्ये टाकून गाडी पेटवली
चारही हत्या केल्यानंतर आरोपींनी हा प्रकार अपघातासारखा दाखवण्याचा प्लॅन आखला. त्यांनी घरातील ट्रॅक्टरमधून डिझेल काढले. त्यानंतर चारही मृतदेह घरातून ओढत नेत स्कॉर्पिओ गाडीत टाकले.
घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर गाडी नेण्यात आली. तिथे मृतदेहांवर आणि गाडीवर डिझेल ओतून स्कॉर्पिओ पेटवून देण्यात आली. जळालेल्या अवस्थेत सांगाडे सापडल्याने पोलिस दिशाभूल होतील असा आरोपींचा समज होता.
इतकेच नव्हे तर आरोपींनी घरी परत जाऊन संपूर्ण घर केमिकलने धुवून काढले. रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
फॉरेन्सिक तपासाने उघड केला कट
आरोपींनी ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे सांगितले होते. मात्र फॉरेन्सिक तपासात त्यांचा खोटेपणा उघड झाला. पोलिसांना स्कॉर्पिओ गाडीच्या मागच्या सीट फोल्ड केलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे मृतदेह जबरदस्तीने कोंबण्यात आल्याचा संशय बळावला.
सावत्र आईचा मृतदेह गाडीबाहेर रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने पोलिसांना ही हत्या असल्याची खात्री पटली. तसेच घरातील भिंतींवर केमिकल वापरून साफसफाई केल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान रक्ताचे अंशही आढळून आले.
याशिवाय ट्रॅक्टरमधून डिझेल चोरीला गेल्याचेही पोलिसांना समजले. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावर गाडी जळालेली सापडली तो रस्ता रुग्णालयाकडे जात नव्हता. त्यामुळे अपघाताचा दावा पूर्णपणे खोटा ठरला.
अल्पवयीन मुलगा ताब्यात
read also : https://ajinkyabharat.com/shirdit-saibabanna-offered-1-crore-gold-crown-lakhnauchya-sai-devotee/
