अकोला : शहरातील गांधी रोडवरील प्रसिद्ध खंडेलवाल आभूषण या सराफा दुकानातून बंटी-बबली आणि आजी
अशा त्रिकुटाने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या चोरट्यांनी हातचलाखीने दुकानातील कर्मचारी महिलेचे लक्ष विचलित करत सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.
Related News
आयुर्वेदिक उपाय: कोमट मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्याने शरीर आणि मन ताजेतवाने होतात
आयुर्वेदिक पाय स्नान : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीर...
Continue reading
17 फेब्रुवारी 2026 रोजी भारतात भर दिवसा अंधार? सूर्यग्रहणाबाबत नेमकं सत्य काय?
2026 मधील पहिले सूर्यग्रहण
खगोलीय दृष्टिकोनातून पाहिलं तर 2026 हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने महत्त्व...
Continue reading
मेझेसपासून बकलावापर्यंत: Hina Khan चा इस्तंबूलमधील खाद्यप्रवास म्हणजे निव्वळ स्वर्गसुख
लोकप्रिय अभिनेत्री Hina Khan ही केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर त...
Continue reading
‘द 50’ रिअॅलिटी शोमधील सर्वात मोठं गूढ: ‘द लायन’ आहे तरी कोण?
‘The Lion ’ कोण? ‘The 50 ’ रिअॅलिटी शोम...
Continue reading
Bigg Boss Marathi 6: “अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा
कलर्स मराठीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो
Continue reading
माजी लिबियन हुकूमशहाचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी ठार झाल्याचा दावा
लिबियाच्या राजकारणात खळबळ, मृत्यूबाबत परस्परविरोधी माहिती
Continue reading
दिवसा होणार काळाकुट्ट अंधार! 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाची उत्सुकता शिगेला, कालावधी आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2026 हे वर्ष खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत...
Continue reading
EPFO Pension Rules : 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार? जाणून घ्या सविस्तर गणित
EPFO पेन्शनवर मोठा दिल...
Continue reading
Budget 2026 : आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार की नाही? अर्थसंकल्पातून काय मिळाले संकेत?
केंद्र सरक...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
घड्याळात ‘11.11’ वाजले की खऱ्या मनापासून इच्छा मागा, परंतु हे खरंच पूर्ण होते का?
आपल्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक छोटे-छोटे संकेत येतात जे आपल्याला अचंबित करतात. त्यापैकी एक लोकप...
Continue reading
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत कर्मचारी महिलेला विविध दागिने दाखवण्यास सांगितले.
यावेळी एका पुरुष आरोपीने महिलेशी संभाषण करत तिचे लक्ष वेधून घेतले.
त्याच वेळी सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने चलाखीने दागिने वृद्ध महिलेच्या हातात दिले आणि तीनही जण बिनधास्त दुकानातून निघून गेले.
विशेष म्हणजे, दुकान मालकाच्या माहितीनुसार, या टोळीतील महिलेनं दीड वर्षांपूर्वी सुद्धा याच दुकानातून चोरी केली होती.
मात्र त्यावेळी ती कोण होती, हे शोधूनही पोलिसांना तिचा माग काढता आलेला नव्हता. आता पुन्हा तिनेच त्याच
दुकानाला लक्ष्य केल्याने ही टोळी नेमकी कोण आहे आणि या मागे कुठली सुसंघटित योजना आहे का, याचा तपास आवश्यक बनतो.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मात्र अद्याप या चोरट्या टोळीचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatil-birth-certificate-scam-motha-reveal-kirit-somayanchi-mahiti/