बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी

अकोट, ता. १२ एप्रिल

अकोट तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती

आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे

Related News

व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

ही मोहीम ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली असून, खानापूर

वेस येथील बौद्ध विवाह मंडपाजवळून मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी बौद्ध धर्मगुरु तथागत गौतम

बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

तालुकाध्यक्ष चरण इंगळे आणि महासचिव रोशन पुंडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या स्वाक्षरी मोहिमेला अकोटमधील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सुमारे ४०० महिला,

पुरुष व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे

पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले होते. यामध्ये संघटक सुरेंद्र ओईबे,

सुरेश गवई, पुरुषोत्तम भटकर, अनिल वानखडे, मिलिंद वानखडे, योगेश आग्रे, सुनीता वानखडे,

मुरलीधर तेलगोटे, मंदा कोल्हे, अर्चना वानखडे, माला वानखडे, शिला लबडे,

सोनू पोहरकार यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या आधिकारात देण्यात यावा,

या मुख्य मागणीसाठी पुढील काळातही ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार

असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने दिली आहे.

Related News